navi mumbai best 7 picnic point  
टूरिझम

Travel : पिकनिकची तयारी करताय?, नवी मुंबईतील 'या' 7 बेस्ट स्थळांना नक्की भेट द्या

मुख्य मुंबईपासून नवी मुंबई शहर सुमारे 25 किमी अंतरावर आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्य मुंबईपासून नवी मुंबई शहर सुमारे 25 किमी अंतरावर आहे.

मुंबई शहर हे धकाधाकीच्या जीवनाचे आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा मुंबईत असणाऱ्या लोकांना शांततेची आणि निवांत वातावरणाची आवश्यकता असते. त्यामुळे ते मुंबई सोडून फिरण्यासाठी काही शांततेच्या ठिकाणांना भेट देत असतात. यातच फिरस्तीची आवड असणाऱ्या लोकांसाठी नवी मुंबई हे एक नियोजित शहर आहे. मुख्य मुंबईपासून हे शहर सुमारे 25 किमी अंतरावर आहे. (navi mumbai best 7 picnic point)

या परिसरात असणारी हिरवळ, मोकळे रस्ते आणि सुंदर वातावरण लोकांना आकर्षित करते. म्हणूनच निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी मुंबईच्या धावपळीतून अनेकजण निवांत क्षण घालवण्यासाठी येथील काही ठिकाणांना आवर्जून भेट देतात. आज आम्ही तुम्हाला नवी मुंबईतील कोणत्या ठिकाणी तुम्ही मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेऊ शकता हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...

पांडवकडा धबधबा

पांडवकडा धबाधबा हे नवी मुंबईतील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हा प्रसिद्ध धबधबा खारघरजवळ आहे. पांडवांनी या ऋतुत येथे स्नान केले होते अशी अख्यायिका आहे, म्हणून याला पांडवकडा असे म्हटले जाते. त्याची उंची सुमारे 107 मीटर इतकी आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य

जर तुम्हाला आकाशात उडणारे पक्षी पाहणे आवडत असेल किंवा पक्षी अभयारण्याला भेट द्यायची असेल तर तुम्ही कर्नाळ पक्षी अभयारण्याला भेट देऊ शकता. नवी मुंबईत असलेलं हे अभयारण्य 500 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलं आहे. येथे तुम्हाला पक्ष्यांच्या 220 हून अधिक प्रजाती पाहायला मिळतील. याशिवाय तुम्ही इथे ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता. अनेकाजण इथे यासाठीच भेट देतात.

नेरुळ फ्लेमिंगो पॉइंट

जर तुम्हाला फ्लेमिंगो पाहणे आवडत असेल तर तुम्ही नेरुळ फ्लेमिंगो पॉइंटला भेट द्या. येथील पाणथळ प्रदेशात तुम्हाला शेकडो फ्लेमिंगो आवाज करताना दिसतील. गुलाबी फ्लेमिंगोची सुंदर छायाचित्रे टिपण्यासाठी आणि फ्लेमिंगोची स्पेशल फोटोग्राफी करण्यासाठी तुम्ही येथे आवर्जुन भेट देऊ शकता.

बेलापूरचा किल्ला

बेलापूरमध्ये असणार हा किल्ला १५०० च्या दशकात जंजिऱ्याच्या सिद्दीनी बांधला होता. त्याकाळी सत्ता बदलून या किल्ल्यावर पोर्तुगीज, मराठा आणि इंग्रजांनी राज्य केलं होतं. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही इथे फिरण्यासाठी जाऊ शकता. बऱ्याचवेळा या ठिकाणी युवकांची गर्दी पहायला मिळत असते. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण बेस्ट मानले जाते.

खारघरच्या टेकड्या

नवी मुंबई हे नयनरम्य टेकड्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. ट्रेकिंगसाठी अनेक ट्रेकर्स येथे आवर्जून भेट देतात. अनेकांचे हे आवडते ठिकाणही आहे. पावसाळ्यात जेव्हा या टेकड्यावर सगळीकडे हिरवळ पसरलेली असते, त्यावेळी येथील नजारे पाहण्यासारखे असतात त्यामुळे या ठिकाणांना भेट देऊ शकता.

नेरुळ बालाजी मंदिर

हे मंदिर नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला एका छोट्या टेकडीवर वसले आहे. हे प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरासारखे दिसते. येथे बालाजीची मूर्ती आहे. याशिवाय विद्या गणपती मंदिर, श्री पद्मावती देवी मंदिर, हनुमान मंदिर, रामानुज मंदिर आणि लक्ष्मी नरसिंह मंदिर इत्यादी अनेक मंदिरे आहेत.

वंडर पार्क

नवी मुंबईतील हे उद्यान सुमारे 30 एकरात पसरले आहे. यात जगातील 7 आश्चर्यांची प्रतिकृती साकारल्या आहेत. येथे तुम्हाला ताजमहालही पाहता येईल. याशिवाय एक मनोरंजन उद्यान असून एक कृत्रिम तलाव आणि एक सुंदर उद्यानही पाहायला मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT