टूरिझम

भटकंती  : खबरदारी आवश्‍यकच... 

पंकज झरेकर

भटकंतीसाठी स्थळ निश्‍चित झाले. पॅकिंग आणि बॅग भरून झाली. सगळी तयारी झाली. आता वेळ आली प्रत्यक्ष प्रवासाची. भटकंतीदरम्यान प्रवासाचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध असतात. विमानप्रवास, रेल्वे, बस, भाड्याने वेगळी गाडी घेऊन केलेला प्रवास, स्वतःच्या गाडीने केलेले लॉंग ड्राईव्ह, मोटरसायकल टूर अशा अनेक पद्धतीने आपण भटकंती करतो. प्रत्येक प्रवासाच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते. 

- विमानप्रवासासाठी चेकइन बॅगेज आणि केबिन बॅगेजचे नियम वेगळे असतात. प्रत्येक एअरलाईनचे सामानाचे आणि त्याच्या वजनाचे काय नियम आहेत, याची पूर्ण माहिती घेऊन तशा बॅग पॅक कराव्यात. बॅगचे वजन जास्त असल्यास त्याचे शुल्क भरावे लागते. कुठल्याही विमानाच्या केबिनमध्ये प्रवाशाला स्वतःजवळच्या बॅगमध्ये धारदार वस्तू आणि द्रवपदार्थ सोबत बाळगता येत नाहीत. सर्व सुरक्षाविषयक तपासण्या पूर्ण करण्याकरिता विमानतळावर एक ते दीड तास आधी पोचावे. 

- विमान, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करताना आपल्याला गंतव्यस्थानी पोचल्यावर स्थलदर्शनासाठी वेगळी गाडी करावी लागते. त्याची नोंदणी आगाऊ केलेली असावी. गाडी ठरवताना शक्यतो स्थानिक आणि रस्त्यांची माहिती आणि सवय असणारा ड्रायव्हर असावा. गाडीचे आणि ड्रायव्हरकडे स्थानिक पर्यटन विभागाचे परमिट आहे की नाही, हे तपासून घ्यावे. लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या भागात एका विभागाच्या गाडीला दुसऱ्या विभागात व्यवसाय करता येत नाही. त्याकरिता आपल्या भटकंतीत अडचण येणार नाही, याची काळजी घ्यावी. 

- बुकिंग, तिकिटे, बोर्डिंग पास आणि वैयक्तिक ओळ्खपत्रांच्या प्रतींचे दोन संच करून दोन जबाबदार व्यक्तींकडे ठेवण्यास द्यावेत. स्वतःच्या किंवा भाड्याने घेतलेल्या वाहनाने, बाईकने भटकंती करताना ते सुस्थितीत आहे याची खात्री करून घ्यावी. त्याची देखभाल आणि सर्व्हिसिंग त्या त्या वेळी झाले आहे, हे तपासावे. 

- मोटरसायकलची क्लच केबल, ऑईल, हवा भरण्याचा पंप किंवा लहान यंत्र, टोइंग हूक, हेडलाईटचे एक्स्ट्रा बल्ब, पंक्चर झालेले चाक बदलण्यास लागणारा जॅक आणि पान्हा गाडीत कायम ठेवावा. 

- प्रथमोपचाराचे साहित्य, गाडीची मूळ कागदपत्रे, वाहन विमा, कायम गाडीत बाळगावे. कारमध्ये असताना सीटबेल्ट, बाईकवर असताना हेल्मेट, रायडिंग सुरक्षा कपडे वापरावेत. 

- गाडी चालवताना ड्रायव्हरच्या शेजारी मॅप पाहून रस्ते सांगणारा आणि ट्रॅफिकची माहिती देणारा मदतनीस असावा. झोप येणाऱ्या व्यक्तीने ड्रायव्हरशेजारी बसू नये. 

- गाडीत सुट्टे सामान (उदा. चेंडू, खेळणी, लहान पिशव्या) इकडेतिकडे पडेल, असे ठेवू नये. पिण्याचे पाणी, औषधे, थोडे खाण्याचे पदार्थ हाताशी असावेत. 

- गाडीत अडचणीला उपयोगी येईल अशी स्वसंरक्षणार्थ एखादी काठी ठेवावी. मोठ्या आवाजात संगीत वाजवू नये. माफक आवाजात गाणी ऐकावीत. 

- कार किंवा बाईक भटकंती करताना वेळोवेळी ठरावीक अंतराने ब्रेक घ्यावा. पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेट करत राहावे. 

- रात्रीच्या वेळी दृष्यमानता अर्ध्याहून कमी होत असल्याने अपघाताचा धोका दुप्पट होतो. सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीचा प्रवास टाळावा. 

- लांबच्या प्रवासाला दोन किंवा अधिक ड्रायव्हर असावेत. 

- कुठल्याही वाहनाशी स्पर्धा करणे, अतिवेगात गाडी चालवणे, स्थानिकांशी हुज्जत किंवा वाद घालणे टाळावे. वाहतुकीच्या नियमांचे कायम पालन करावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील व्हा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT