Mi-17V5 Helicopter Crash : : तामिळनाडूच्या कून्नर जिल्ह्यामध्ये निलगिरीच्या पर्वतरांगामध्ये Mi-17V5 हेलीकॉप्टर ( Mi-17V5 Helicopter) अपघातामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्यासोबत 13 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेची तपासणी सुरू असून ब्लॅक बॉक्समुळे नक्की काय घडले हे लवकरच समजेल. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण कुन्नूरचे खराब वातावरण असल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. हा दावा खात्रीपूर्वक मानला जाऊ शकत नाही कारण Mi-17V5 हेलिकॉप्टर नाईट व्हिजन, ऑटो पायलट मोड आणि वेदर रडार सारख्या लेन्स असतात. या गोष्टींमुळे या घटनेबाबत शंका निर्माण होत आहे.
Mi-17V5 हेलीकॉप्टर अपघाताची घटना जिथे घडली, तिथे घनदाट जंगल आहे. पर्वत रांगा आणि लो व्हिजिबिलिटीमुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची चर्चा सुरू आहे. वेलिंगटनचे हेलिपॅड देखील जंगली आणि पर्वत रांगानंतर लगेच आहे. त्यामुळे पायलटला हे अंतर लांबून दिसणे अवघड आहे. त्यात खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरचे लँडिग नेहमी कठीण असते. त्यामुळे, असे गृहित धरले जात आहे की, कमी व्हिजिबिलिटीमुळे हेलीकॉप्टर कमी उंचीवर उडत होते. लँडिग पॉईंटपासून अंतर कमी असल्यामुळे हेलीकॉप्टर खूप खाली होते. खाली घनदाट जंगल होते, त्यामुळे लँडिंग फेल झाले. या हेलिकॉप्टरचे पायलट ग्रुपमध्ये कॅप्टन आणि सिओ रँक अधिकारी होते, जे सैन्यातील सर्वात सक्षम पायलट होते. या हेलिकॉप्टर दोन इंजिन होते, अशामुळे जर एक इंजन फेल झाले तर दुसऱ्या इंजिनद्वारे लँडिग करता येऊ शकत होते.
नीलगिरी हा दख्खन पठारावर स्थायिक 24 पर्वतांचा एक समूह आहे. हे सर्व पर्वत समुद्र सपाटीपासून साधारण2000 मीटर (6,562 फुट) उंचीवर आहे. प्रसिध्द पर्यटन स्थळ उटी, कुन्नूर आणि काटागिरी निलगिरीच्या पर्वतरांगामध्येच येतात. तामिळनाडूच्या पश्चिम दिशेला निलगिरी पर्वतांमध्ये कर्नाटक व केरळ पर्यंत जातात. हे डोंगर पश्चिमी घाटांचा भाग आहे. नीलगिरीच्या डोंगरावर उत्तर अन्नामलाई आणि दक्षिण पालनी पर्वतांनी वेढलेली आहे, 130 किमी रुंदी आणि 185 किमी उंचीमध्ये विस्तारलेल्या निलगिरी पर्वताचे एकूण क्षेत्रफळ 2,479 किमी आहे.
मुकुर्थी नॅशनल पार्क सोबत काही भाग युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये येतो. 2,637 मीटर (8,652 फुट) उंच डोडाबेटा येथील सर्वात उंच पर्वत आहे. कुलकुडीची उंची 2,439 मीटर आहे आणि सर्वात छोटा पर्वत हुलीकल दूर्गची उंची 562 मीटर आहे. कन्नडमध्ये हुलीकल दूर्गला 'टाईगर रॉक फोर्ट' म्हणतात आणि संस्कृतमध्ये याला 'बकासुर पर्वत' नावाने ओळखले जाते. भारतात निलगिरी पर्वत प्रसिद्ध आहे कारण येथे 100 वर्षांपासून चहाचे उत्पादन केले जाते. निलगिरी पर्वतावर कित्येक प्रकारचे चहाचे रोपे आहेत.
निलगिरी पर्वत रांगा कर्नाटक आणि केरळ जक्शंनवर स्थायिक आहे. हे पश्चिमी घाटाचा एक भाग आहे. पर्वांताच्या या रांगेला 'निलिगिरी हिल्स' किंवा 'क्वीन ऑफ द हिल्स' किंवा, 'ब्लू माऊंटेन्स' नावानेही ओळखले जाते. नीलगिरी पर्वत एक अशी पर्वतरांगा आहे जिथे टोकदार शिखर आहे. या पर्वातांना किंवा शिखरांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या रेंजमधील सर्वात उंच शिखर डोड्डाबेट्टा आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याचा धोका असतो.
सर्वसाधारणपणे विमान आकाशात जवळपास 25000-35000 फूट उंचीवर उडतात. इतक्या उंचीवर असल्यामुळे ते नेहमी त्या प्रदेशातील पर्वतांच्या टोकांच्या खूप उंचावरून उड्डान करतात. एवढ्या उंचीवर रडार स्टेशनसोबत संपर्क ठेवणे सोपे होते. रडारच्या तरंग (Wave) सरळ रेषेत चालतात पण, हेलीकॉप्टर विमानाप्रमाणे जास्त उंचीवर उडू शकत नाही. या पर्वतांच्या टोकांमधून उड्डान करायचे असते. इतकेच नव्हे तर पर्वातांमधील कोणत्याही दरीतील खूप छोटी जागेत उतरावे देखील लागते. अशा वेळी रडारसोबतचा संपर्क तुटतो.
हेलिकॉप्टर दिवसा उड्डाण करतात आणि शक्य तितक्या वेळ ग्राउंड रडार स्टेशनच्या संपर्कात राहतात. परंतु टेकड्यांमध्ये पायलट स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवून हेलिकॉप्टर उड्डाण करतात. या धुक्यात हीच गोष्ट करणे अशक्य असल्यामुळे अशावेळी हेलिकॉप्टर चालवणे कठीण होत आहे. निलगिरीच्या टेकड्या अनेकदा दाट धुके पसरलेले असते. नीलगिरी पर्वतावर अशा रांगा आहेत ज्यांचे शिखर टोकदार आहे. या भागात हेलिकॉप्टरची कमाल उंची 3000-3500 मीटरपेक्षा कमी असते.
क्लाइमेट चेंज (climate change) चा परिणाम निलिगिरी पर्वतांवर झाला आहे. मे 2020मध्ये कार्बनडायऑक्साईडची पातळी 417 प्रत्येकी दहा लाख होती जी 30 लाख वर्षांमधील उच्च पातळी आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे या क्षेत्रामध्ये अत्यंत तीव्र वातावरण बदल होतात. गेल्या दहा वर्षांमध्ये पश्चिमी घाटांनी 8 वादळांचा सामना केला आहे. येथे नेहमी छोटे वादळ आणि अतिवृष्टीची स्थिती असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.