Parasailing Sakal
टूरिझम

Parasailing: पहिल्यांदाच पॅरासेलिंग करताय? मग 'या' टिप्सकडे करू नका दुर्लक्ष

पुजा बोनकिले

Parasailing: जवळजवळ प्रत्येकाला कामासह फिरायला आवडते. म्हणून, जेव्हा जेव्हा कोणाला वेळ मिळेल तेव्हा ते कुटुंब, मित्र आणि जोडीदारासह त्यांच्या आवडत्या ठिकाणी भेट देण्यासाठी जातात.

प्रवासासोबतच अनेकांना साहसी उपक्रम करण्याचीही खूप आवड असते. म्हणूनच बरेच लोक डोंगरात ट्रेकिंग, हायकिंग, बोटिंग, पॅराग्लायडिंग, स्नो रायडिंग आणि बाइक रायडिंगसाठी करतात.

 आजकाल अनेक लोकांमध्ये पॅरासेलिंगची खूप क्रेझ आहे. जर तुम्ही पहिल्यांदा पॅरासेलिंग करण्याचा विचार करत असाल पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

पॅरासेलिंग म्हणजे काय?

जर तुम्ही पहिल्यांदा पॅरासेलिंग करण्याचा विचार करत असाल, तर पॅरासेलिंग म्हणजे काय हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे?  पॅरासेलिंगमध्ये पॅराशूटला दोरीच्या साहाय्याने बोटीला जोडून खेचले जाते. पॅराशूटच्या साहाय्याने व्यक्तीला बांधले जाते आणि इलेक्ट्रिक बोटीतून वेगाने ओढले जाते. पॅरासेलिंगचा आनंद केवळ पाण्यातच नाही तर सपाट जागेवरही घेता येतो. हा मजेदार खेळ युरोपियन देशांबरोबरच भारतातही खूप पसंत केला जात आहे.

स्वत:ला तयार करा

पॅरासेलिंग हा एक साहसी उपक्रम आहे. ज्याप्रमाणे तुम्ही पॅराग्लायडिंगसाठी काही दिवस अगोदर स्वत:ला तयार करा, त्याच पद्धतीने तुम्हाला पॅरासेलिंगची तयारी करावी लागेल. जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल असे करणे टाळावे. जर तुम्हाला पाण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही समुद्र किंवा तलावात पॅरासेलिंग टाळावे.

कुठे घेऊ शकता आनंद

युरोपीय देशांबरोबरच भारतातही पॅरासेलिंगची क्रेझ गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे.  तुम्हालाही भारतातील पॅरासेलिंगचा उत्तम आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही पॅरासेलिंगसाठी तुम्ही गोवा, केरळ आणि लक्षद्वीप सारख्या किनारी भागांना भेट देऊ शकता. याशिवाय राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये पॅरासेलिंगचा आनंदही घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT