Ramoji Filmcity esakal
टूरिझम

Ramoji Filmcity : बाहुबलीच्या सेटपासून ते विदेशी पक्ष्यांपर्यंत सर्वकाही एकाच छताखाली असणारी ‘रामोजी फिल्म सिटी’ तुम्ही पाहिलीय का?

Monika Lonkar –Kumbhar

Ramoji Filmcity : तेलंगणा राज्यात हैदराबाद शहराजवळ स्थित असलेली रामोजी फिल्म सिटी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ दिवंगत रामोजी राव यांनी ही फिल्मसिटी वसवली आहे. या फिल्मसिटीमध्ये तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि मराठीसहीत इतर अनेक भाषांमधील चित्रपटांचे शूटिंग या फिल्मसिटीमध्ये होते.

या फिल्मसिटीमध्ये विविध प्रकारचे सेट उभारण्यात आले आहेत. एअरपोर्ट, आकर्षक उद्यान, मोठे हॉटेल्स, तुरूंग, इत्यादी प्रकारचे मोठे सेट्स आणि खाण्याचे स्वादिष्ट पर्याय हे सर्व एकाच छताखाली उभारण्यात आले आहे. चित्रपट निर्मिती युनिट्ससाठी संसाधने आणि सुविधा एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने टॉलिवूड निर्माते दिवंगत रामोजी राव यांनी १९९६ मध्ये या फिल्मसिटीची स्थापना केली होती.

विशेष म्हणजे रामोजी फिल्मसिटीला जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून मान्यता आणि प्रमाणपत्र मिळाले आहे. जर तुम्ही कधी हैदराबादला फिरायला गेलात तर या रामोजी फिल्मसिटीला नक्की भेट द्या. तिथे गेल्यावर कोणती ठिकाणे तुम्ही पाहायला हवीत? त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रिंन्सेस स्ट्रीट ऑफ लंडन

तुम्हाला हैदराबादमध्ये राहून लंडनच्या रस्त्यावर फिरण्याची मजा घ्यायची आहे का? तर रामोजी फिल्मसिटीमध्ये गेल्यावर या प्रिंन्सेस स्ट्रीट ऑफ लंडनला अवश्य भेट द्या.

Ramoji Filmcity

या स्ट्रीटवर उंच इमारती, हवेली, मोठी घरे आणि हिरव्यागार बागांनी भरलले रस्ते तुम्हाला थेट लंडनमध्ये घेऊन जातील. या प्रिंन्सेस स्ट्रीटवर अनेक चित्रपटांचे शूटिंग केले जाते.

विंटेज बसमध्ये करा फिल्मसिटीची सफर

रामोजी फिल्मसिटी ही विस्तीर्ण अशा पटांगणात पसरली आहे. त्यामुळे, ही सिटी पाहण्यासाठी तुम्हाला विंटेज बसचे तिकीट काढावे लागेल. या बसमध्ये बसून तुम्हाला फिल्मसिटीची सफर करता येईल.

Ramoji Filmcity

या सिटीमध्ये तुम्हाला मुघल गार्डन, बोन्साय गार्डन, जपानी गार्डन, अस्करी गार्डन आणि सन फाउंटन यांसारख्या आकर्षक बागा पाहता येतील. फिल्मसिटीमध्ये गेल्यावर या विंटेज बससोबत फोटो काढायला अजिबात विसरू नका.

विदेशी पक्षी उद्यान

रामोजी फिल्मसिटीमधील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे हे विदेशी पक्षी उद्यान होय. रामोजी फिल्मसिटीमध्ये गेल्यावर हे ठिकाण नक्की पाहा. हे असे एकमेव उद्यान आहे की, जिथे तुम्हाला भारत आणि परदेशातून आणलेल्या अनेक प्रकारच्या पक्ष्यांना भेटण्याची संधी मिळेल.

थोडक्यात हे उद्यान आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, डेन्मार्क, इटली, इंडोनेशिया, मेक्सिको इत्यादी जगभरातील अनेक पक्ष्यांचे घर आहे. या उद्यानामध्ये तुम्हाला विविध जातींची फुलपाखरे देखील पाहता येतील.

अप्रतिम बाहुबली सेट

बाहुबली या चित्रपटाने जगभरात अनेक रेकॉर्ड्स मोडले. या गाजलेल्या सिनेमाने जगभरात कोटींची कमाई केली.

Ramoji Filmcity

या सुपरहीट चित्रपटाचा सेट देखील याच रामोजी फिल्मसिटीमध्ये तुम्हाला पहायला मिळेल. या चित्रपटाचा सेट पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. बाहुबली चित्रपटातील महिष्मती, बाहुबली, भल्लालदेव, देवसेना, कट्टप्पा या प्रमुख पात्रांच्या कलाकृती पाहता येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner: गुलिगत धोका फेम सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता; बिग बॉसची ट्रॉफी निघाली बारामतीला

Indian Air Force च्या Air Show मध्ये चार जणांचा मृत्यू, ९६ जण जखमी, घटनेनं खळबळ

IND vs BAN: भारतीय गोलंदाजांच्या चक्रव्ह्युवमध्ये अडकले बांगलादेशी फलंदाज! सूर्याच्या शिलेदारांसमोर १२८ धावांचे लक्ष्य

Dombivali Traffic : डोंबिवलीत अभूतपूर्व वाहन कोंडी; 5 मिनिटांच्या प्रवासासाठी लागला तासभर

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE: सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता, वाचा ग्रँड फिनालेमध्ये नेमकं काय काय घडलं

SCROLL FOR NEXT