Religious Traveling  esakal
टूरिझम

Religious Traveling : काय सांगताय! एका रात्रीत उभी राहिलीत ही मंदिरे ; पौराणिक कथा वाचून नक्की भेट द्याल

अनेक मंदिरे तर हजारो शेकडो वर्षे जुने आहेत

सकाळ डिजिटल टीम

Temples In India : आपल्या देशात मंदिरांची संख्या अधिक आहे. त्यामूळेच हा हिंदुंचा देश म्हणून ओळखला जातो. गल्लीबोळापासून अनेक मोठी राज्ये मंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या भारतभूमीवर आयोध्येत राममंदिर उभारण्यात येणार आहे.

राम जन्मभूमीच्या वादामूळे कित्तेक वर्ष हे मंदिर वादात अडकले होते. कायदेशीर बाजू मिटली असली तरी अद्याप हे मंदिराचा प्रकल्प ताटकळत आहे. हे चित्र एकीकडे आणि दूसरीकडे एका रात्रीत उभे राहिलेली मंदिरेही आपल्याच देशात आहेत.

होय, आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत. जी चक्क एका रात्रीत बांधण्यात आली आहेत. देशात तुम्हाला अनेक मंदिरे दिसतील. जी अद्भूत चमत्कारच वाटतात. अनेक मंदिरे तर हजारो शेकडो वर्षे जुने आहेत. प्रत्येक मंदिराशी एक पौराणिक कथा जोडलेली आहे. या कथाही अचंबित करणाऱ्या आहेत. आज एका रात्रीत तयार झालेली मंदिरे आणि त्यामागिल पौराणिक कथा पाहुयात.

गोविंद देव मंदिर (Govind Dev Mandir)

उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे गोविंद देवांचे हे मंदिर आहे. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की ते एका रात्रीत बांधले गेले आहे. या मंदिराचे काम एका रात्रीत पूर्ण व्हावे यासाठी राक्षस आणि समस्त स्वर्गातील देवतांनी मेहनत केली होती. पण, सूर्योदयापूर्वी ते पूर्ण करू न शकल्याने मंदिर अपूर्ण राहिल्याचे सांगितले जाते. अपूर्ण असले तरीही याचे पूर्ण असलेले बांधकाम सुरेख वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमूना आहे.

देवघर मंदिर (Deoghar Mandir)

झारखंडमधील देवघर मंदिर देवता विश्वकर्मा यांनी बांधले असल्याची मान्यता आहे. हे मंदिर देवता विश्वकर्मा यांनी भगवान शंकरांना समर्पित केले आहे. त्यामागील कथा अशी आहे की, एकदा लंकाधिपती रावण भगवान शंकरांना शिवलिंगाच्या रूपात आपल्या देशात घेऊन जाण्याच्या हट्टाला पेटले होते.

त्यांची स्थिती पाहून शंकरांनी ते मान्य केले. परंतु शिवलिंग जमिनीला स्पर्श करू नये, अशी अटही घातली. रावणाची फिरकी घेण्यासाठी शकरांनी शिवलिंग जमिनीला टेकवले. पण, तिथून ते हलवण्यासाठी रावणाने अथक प्रयत्न केले. शिवलिंग तेथून हलवणे कठीण होते. त्यामुळे भगवान विश्वकर्मां यांनी तेथेच एका रात्रीत मंदिर बांधले.

काकनमठ (Kakanmath)

मध्य प्रदेशातील मुरैना येथे बांधलेल्या या प्रसिद्ध मंदिराच्या निर्मितीमागे एक कथा आहे. असे मानले जाते की हे मंदिर एका रात्रीत भगवान शंकरांचे भक्त असलेल्या अघोरी शिवभक्त भूतांनी बांधले आहे. असेही सांगण्यात येते की, हे मंदिर मोर्टार किंवा सिमेंट न वापरता बांधले गेले.कारण काहीही असले तरी सध्या या मंदिरात भक्तांची मांदियाळी असते.

हथिया देवल (Hathiya Deval)

उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये भगवान शंकरांचे मंदिर आहला हातिया देवल म्हणून ओळखले जाते. एकच हात असलेल्या कारागिराने एका रात्रीत हे मंदिर बांधले होते. अशी मान्यता या मंदिरात येणाऱ्या लोकांमध्ये आहे. पण, या कारागिराच्या एका चूकीमूळे येथे शिवलिंगाची पूजा केली जात नाही. सुर्योदयापूर्वी हे मंदिर पूर्ण करण्याच्या नादात कारागिराने शिवलिंगाची दिशा चूकीची केली आहे. त्यामूळे येथे पूजा होत नाही.

भोजेश्वर मंदिर (Bhojeshwar Mandir)

महाभारतातील पांडवांच्या आयुष्यात वनवासात भोगावा लागला होता. त्या वनवासाच्या काळात भगवान शंकर त्यांच्या स्वप्नात दिसले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या आईशी याबद्दल चर्चा केली. त्यावर आईने पांडवांना जेथे स्वप्न पाहिले होते. तेथे मंदिर बांधण्याचा सल्ला दिला. त्यामुळे भोजेश्वर मंदिराचे बांधकाम एका रात्रीत पूर्ण झाले, आख्यायिका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : छगन भुजबळ यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT