Satara Tourism Kaas Pathar 
टूरिझम

कास पठारावर बहरले फुलांचे गालिचे; लाल, गुलाबी, पांढऱ्या, निळ्या रंगांची आकर्षक उधळण, पर्यटकांचा मोठा प्रतिसाद

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप देऊन उन्हाची चांगलीच तिरीप पठाराला लागत आहे. त्यामुळे कास पठारावर रंगीबेरंगी फुलांचा सोहळा ऐन बहरात आला आहे.

कास : हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ती खेळत होती.. या बालकवींच्या उक्तीप्रमाणे फुलांची पंढरी असलेल्या कास पठारावर (Kaas Pathar) जिकडे तिकडे रंगीबेरंगी फुलांचे गालिचेच पाहावयास मिळत आहेत.

कास हंगाम (Kaas Plateau Flowering Season) सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप देऊन उन्हाची चांगलीच तिरीप पठाराला लागत आहे. त्यामुळे कास पठारावर रंगीबेरंगी फुलांचा सोहळा ऐन बहरात आला आहे. विशेषतः कुमुदिनी तलावाच्या (Kumudini Lake) परिसरात असलेल्या भागात लाल गुलाबी तेरडा, पांढरा गेंद यांचे मोठ्या प्रमाणात गालिचे पाहावयास मिळत आहेत. हे गालिचे पाहून पूर्वीच्या कास पठाराची आठवण आवर्जून येत आहे.

त्याबरोबर निळी सीतेची आसवे, सोनकी, अबोलीमा, अभाळी, नभाळी, मंजिरी, चवर, टूथब्रश, कापरू, पंद, भुईचक्र यासारखी अनेक फुले बहरली आहेत. बहुतांश ठिकाणी लाल, निळ्या, पांढऱ्या रंगाचे छोटेमोठे गालिचे तयार झाले आहेत. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी पर्यटक कासला गर्दी करत आहेत. चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, गुलाबी थंडी, अधूनमधून येणारे धुके यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.

Satara Tourism Kaas Pathar

अनुकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे यावर्षी कासवर फुलांचा चांगला बहर आहे. या फुलांचे जीवनमान फार कमी काळ टिकते. त्यामुळे पर्यटकांनी या महिनाअखेरपर्यंत कासवर आल्यास मोठ्या प्रमाणात फुले पाहता येतील. पर्यटकांनी गैरसोय टाळण्यासाठी व चांगल्या प्रकारे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शनिवार, रविवार सोडून यावे.

-दत्ता किर्दत, अध्यक्ष, कास समिती

कुमुदिनी तलावात उमलले कमळ

कास पठारावरील महाबळेश्वरकडे जाणाऱ्या राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुमुदिनी तलावात नायफांडिस इंडिका (कुमुदिनी) नावाची कमळे बहरण्यास सुरुवात झाली आहे. तलाव असंख्य फुलांनी बहरलेले पाहावयास मिळत आहे. तलावात मोजता येणार नाही, एवढी पांढरी शुभ्र कमळे फुललेली आहेत. कासचा फुलोत्सव ऐन बहरात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जनता विचारते आहे, पाच वर्ष झोपले होते का? मोदी-शहा यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही : प्रकाश आंबेडकर

Pawan Kalyan Daughter: तिरुपती बालाजीचे दर्शन फक्त हिंदूंनाच घेता येते का? मंदिर प्रवेशापूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या मुलीकडून काय लिहून घेतले?

Share Market Opening: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 800 अंकांनी खाली, निफ्टी 200 अंकांनी घसरला; सर्व क्षेत्रात लाल रंगाचे वर्चस्व

Ambabai Temple : शारदीय नवरात्रोत्सवात अंबाबाई देवीची कशी असणार अलंकारिक पूजा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Latest Marathi News Updates : नागपूरमध्ये बससेवा बंद: कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

SCROLL FOR NEXT