Satara Tourism esakal
टूरिझम

Satara Tourism : जावळी खोऱ्याचे निसर्ग सौंदर्य खुलले! हिरवेगार डोंगर, धुक्याची दुलई; कासचा हंगामही बहरात

सकाळ डिजिटल टीम

कासबरोबरच बामणोली, मुनावळे, वासोटा किल्ला, सह्याद्रीनगर आदी निसर्ग पर्यटनस्थळे आहेत, तर क्षेत्र कुसुंबीची काळूबाई, मेरुलिंग आदी धार्मिक स्थळ आहेत.

कास : जावळी तालुक्यातील घनदाट जंगल, नद्यांची खोरी आणि मॉन्सूननंतर खुललेल्या निसर्ग सौंदर्याने पर्यटकांची (Tourists) पावले इकडे वळत आहेत. हिरवेगार डोंगर, धुक्याची दुलई आणि जागोजागी आढळणारे विविधरंगी फुलांच्या प्रजातींमुळे जावळी खोऱ्याच्या निसर्ग सौंदर्यात भर पडली आहे.

जावळी तालुका (Javali Taluka) दुर्गम म्हणूनच ओळखला जातो. जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार याच तालुक्यात असून, सध्या कासचा हंगाम ऐन बहरात आहे. कासबरोबरच बामणोली, मुनावळे, वासोटा किल्ला, सह्याद्रीनगर आदी निसर्ग पर्यटनस्थळे आहेत, तर क्षेत्र कुसुंबीची काळूबाई, मेरुलिंग आदी धार्मिक स्थळ आहेत. पर्यटनाचा खजिनाच या भागात असला, तरी पायाभूत सुविधांची वानवा असल्याने म्हणावे तसे पर्यटक येत नाहीत.

जागतिक वारसा स्थळ कास जावळीत असले, तरी त्याचा तालुक्याला आर्थिकदृष्ट्या फायदा होत नाही. पुणे- बंगळूर महामार्गापासून तालुक्याला जोडणारा व कोकणात थेट जाणारा पाचवड- मेढा- कुसुंबी ते सह्याद्रीनगरवरून बामणोली ते खेड असा प्रस्तावित महामार्ग झाल्यास या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढून तालुक्यातील तरुणांना पर्यटन पूरक रोजगार निर्माण करता येणार आहे.

तालुक्याची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. येथे कोणताही औद्योगिक प्रकल्प नसल्याने व शेती अल्प असल्याने पर्यटनातूनच या भागाचा विकास शक्य असून, याकडे प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे, अशी भावना सर्वसामान्य जावळीकरांची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ठरलं तर अपक्ष, नाहीतर पाडापाडी; तिसऱ्या आघाडीबाबत मनोज जरांगेंकडून मोठा निर्णय

Former MLA Dnyaneshwar Patil: ड्रायव्हर ते दोन वेळा आमदार... शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन

Navratri Fast Recipe: नवरात्रीत उपवासाला बनवा दही-आलू, नोट करा रेसिपी, दिवसभर राहाल उत्साही

Love Jihad: अवैध धर्मांतरासाठी होतोय ‘लव्ह जिहाद’चा वापर, न्यायालयाचे निरीक्षण; विशिष्ट समाजघटकांचा कट

Latest Maharashtra News Updates : आजपासून शक्तीचा जागर, अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT