Kas flower plateau esakal
टूरिझम

पर्यटकांना खुशखबर! कास पठार 'खुले', समितीकडून हंगामाची तयारी पूर्ण

सूर्यकांत पवार

कास (सातारा) : कोरोना संकटामुळे (Coronavirus) गतसाली बंद असलेले सातारा जिल्ह्याचे वैभव 'पुष्प पठार कास'चा (Kas flower plateau) अधिकृत हंगाम पंचवीस ऑगस्टपासून चालू होत असून हंगामाची (Kas Season) पूर्वतयारी कास पठार कार्यकारी समितीमार्फत (Kas Pathar Executive Committee) पूर्ण झालीय. कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन करणे अत्यावश्यक ठरणार असून यासंदर्भात समितीने आवश्यक तयारी केली आहे. यामध्ये सहा गावांतील साधारणपणे १४० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची ओळख परेड करण्यात आली.

कोरोना संकटामुळे गतसाली बंद असलेल्या 'पुष्प पठार कास'चा अधिकृत हंगाम पंचवीस ऑगस्टपासून चालू होत आहे.

या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी सुलभपणा यावा आणि गोंधळ उडू नये, यासाठी वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये पार्किंग व्यवस्था विभाग, स्वच्छता विभाग, गाईड्स विभाग, कार्यालय विभाग, माहिती पुस्तिका विक्री केंद्र विभाग, तिकिट चेक पोस्ट, बस तिकीट कलेक्शन, उपद्रव शुल्क वसुली नियोजन, रात्र पाळी नियोजन, बस डिझेल पुरवठा इत्यादी कामाप्रमाणे विभाग करून, या विभागात कर्मचाऱ्यांची वर्गवारी करून विभाग प्रमुख नेमण्यात आले आहेत. साठ वर्षांवरील इच्छुक कर्मचाऱ्यांना जोखमीची कल्पना देऊन त्यांची आरोग्य तपासणी करून तंदुरुस्त असणाऱ्यानाच नेमण्यात आले आहे.

कामाचे स्वरुप आणि जबाबदाऱ्या याविषयी प्रशिक्षण वनक्षेत्रपाल आर. एस. परदेशी, सचिव निलेश रजपूत, समिती सदस्य गोविंद बादापूरे, सोमनाथ जाधव, अध्यक्ष मारुती चिकणे, श्रीरंग शिंदे, बजरंग कदम, दत्तात्रय किर्दत, ज्ञानेश्वर आखाडे यांनी दिले. पार्किंग, तसेच दळणवळण भागाची पाहणी करुन त्याच्या साईडपट्ट्या डागडुजी करण्याचे ठरले. शौचालय व पाईपलाइन तुटमोड दुरुस्ती काम तात्काळ सुरू करून पूर्ण करण्यात आली आहेत. पर्यटकांना मार्गदर्शनासाठी जागोजागी सूचना फलक लावण्यात आले आहेत. हंगामासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाली असून बुधवार पंचवीस ऑगस्टपासून हंगाम अधिकृतपणे चालू होत आहे.

पठारावर सध्या चांगले ऊन पडत असल्याने लवकरच फुलांचे गालिच्छे बहरणार आहेत. तरीही सद्यस्थितीत काही दुर्मिळ फुले उमलली आहेत. ज्या पर्यटकांना कंपाऊंडच्या आतमध्ये जावून फुले पाहायची आहेत, अशा लोकांकडूनच शुल्क आकारले जाणार आहे. सध्या फुले कमी असल्याने कोणावरही शुल्क वसुलीसाठी जबरदस्ती असणार नाही. पण पठारावर आतमध्ये फिरावयाचे झाल्यास शुल्क द्यावेच लागेल.

-मारूती चिकणे, अध्यक्ष कास पठार कार्यकारी समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' आठवले नेमकं काय म्हणाले?

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT