Travel in omicron e sakal
टूरिझम

ओमिक्रॉनच्या संकटात फिरण्याचा प्लॅन रद्द करायचा का? वाचा तज्ज्ञांचं मत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सध्या जगावर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचं (Omicron Variant) संकट आहे. त्यामुळे अनेक देशांनी प्रवासावरील निर्बंध कडक केले आहेत. पण, ओमिक्रॉन येण्यापूर्वीच तुम्ही फिरायला जायचे नियोजन केले (Travel Plan In Omicron) असेल तर घाबरू नका. तिसरी लाट येईल या भीतीने तुम्ही तुमचे नियोजन रद्द करू नका, असं खुद्द केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले आहे. मात्र, प्रवाशांनी योग्य ती काळजी घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं. पण, या संकटात तुम्ही तुमचा प्लॅन खरंच रद्द करावा का? याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आला. त्यानंतर हळूहळू इतर देशांमध्ये या व्हेरियंटचा शिरकाव झाला. जवळपास ४० देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असून आता या यादीमध्ये भारताचा देखील समावेश झाला आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकमध्ये २, गुजरातमधील जामनगर, मुंबईतील डोंबिवली प्रत्येकी एक आणि दिल्लीमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे प्रवासावरील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मात्र, या ओमिक्रॉनच्या संकटात तुमचं फिरायचं नियोजन असेल तर कशी काळजी घ्यायची ते पाहुयात.

तुम्हाला फिरण्याचा प्लॅन रद्द करायला पाहिजे का? -

ओमिक्रॉनपूर्वीच तुम्ही फिरायला जायचा प्लॅन केला असेल तर तो आता रद्द करायचा का? याबाबत डेन्व्हर विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय प्रवासी जोखीम विश्लेषक कोर्टनी निब्रझिडोस्की यांनी न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, लोकांनी या काळात प्रवासाचा विचार करताना स्वतःला दोन प्राथमिक प्रश्न विचारले पाहिजेत. पहिला प्रश्न म्हणजे, तुमचा प्रवास पुढे ढकलला जाऊ शकतो का? आणि दुसरा 'या काळात प्रवास करण्यास तुम्ही किती परवडणार आहे?'. त्यानंतर प्रवासाचं नियोजन केलं पाहिजे. इतकेच नाहीतर प्रवास केल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होणार आहे याबाबत देखील प्रवाशांनी विचार करणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही फिरायला गेल्यानंतर संबंधित राज्य किंवा देशाने कोरोना चाचणी केली आणि तुम्ही पॉझिटिव्ह आढळले तर विलगीकरणात राहावे लागेल. या सर्व गोष्टींचा विचार फिरायला जाताना केला पाहिजे.

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांच्या प्रवासाचे काय? -

तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल आणि ओमिक्रॉनच्या संकटात तुमचं फिरायला जायचं नियोजन असेल तर अशावेळी काय करायचं? याबाबत चिकित्सक जेसिका हर्झस्टीन सांगतात, ''लसीकरण न केलेले किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या कुठल्याही व्यक्तीने फिरायला जाऊ नये. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ओमिक्रॉनची रुग्णसंख्या जास्त असेल अशा ठिकाणचे प्लॅन रद्द करावे. मात्र, तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही बूस्टर डोस घ्यावा आणि वारंवार रॅपिड अँटीजेन चाचणी करावी, असंही त्या सांगतात. आतापर्यंत अनेक देशांना बूस्टर डोसला परवानगी दिली आहे. मात्र, भारतात अद्यापही बूस्टर डोसबाबत धोरण जाहीर झालेले नाही.

प्रवास करताना कोणत्या प्रकारचे मास्क वापरायचे? -

या काळात तुम्हाला प्रवास करायचा असेल तर कुठलं मास्क वापरणं योग्य ठरेल? याबाबत अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीनचे अध्यक्ष डेव्हिड फ्रीडमन सांगतात, ''प्रवास करताना आपण कोणता मास्क वापरतो हे महत्वाचे आहे. लोकांनी कापड किंवा घरगुती मास्क वापरू नये. N95 किंवा KN95 मास्क प्रवासादरम्यान वापरावे असा सल्ला ते देतात. कारण, प्रवासात संक्रमित व्यकी तुमच्या संपर्कात कधी येईल हे सांगता येत नाही. लहान मुलांसोबत प्रवास करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

एखाद्या देशात अडकून पडण्याचा धोका?

सध्याच्या निर्बंधामुळे एखाद्या देशात अडकून पडण्याची भीती नाकारता येत नाही. कारण, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी प्रवासावरील निर्बंध कडक केले आहेत. प्रवासादरम्यान तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला तिथून दुसरीकडे जाता येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT