Jagannath Puri Temple: हिंदू धर्मानुसार चार धाम म्हणजे बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि पुरी असं म्हणतात की जेव्हा भगवान विष्णू चार धामवर स्थायिक झाले तेव्हा ते प्रथम बद्रीनाथ येथे गेले आणि तेथे स्नान केले, त्यानंतर ते गुजरातमधील द्वारका येथे गेले आणि तेथे कपडे बदलले. द्वारकेनंतर त्यांनी ओडिशातील पुरी येथे भोजन केले आणि शेवटी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे विश्रांती घेतली. पुरीत भगवान श्री जगन्नाथाचे मंदिर आहे.
पुरीच्या या मंदिरात भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत. लाकडी मूर्ती असलेले हे देशातील अद्वितीय मंदिर आहे. जगन्नाथ मंदिरात अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, तसेच मंदिराशी संबंधित अशा अनेक कथा आहेत ज्या शतकानुशतके एक गूढ रहस्य म्हणून प्रचलित आहेत.
यातलेच एक वैशिष्ट्य म्हणजे, पुरीच्या मंदिरात आजही श्रीकृष्णाचे हृदय असल्याचं सांगितलं जातं. यामागे अनेक कथा आहेत, लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्रीकृष्णाचे हृदय जिवंत माणसासारखे धडधडत होते. असे म्हटले जाते की ते हृदय अजूनही सुरक्षित आहे आणि भगवान जगन्नाथाच्या लाकडी मूर्तीच्या आत आहे.
नक्की काय आहे कथा?
महाभारत युद्ध होऊन 35 वर्षे नंतर एक दिवस श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न अर्थात सांब याने आपल्या काही मित्रासोबत ऋषिंची गंमत केली. तो स्त्री वेष धारण करुन ऋषि विश्वामित्र, दुर्वासा, वशिष्ठ व नारद यांना भेटायला गेला. त्यावेळी ते सगळे श्रीकृष्णाबरोबर एका औपचारिक बैठकीत सामिल होण्यासाठी द्वारकेस आले होते.
सांबने आपल्या वस्त्रात एक लोखंडी मुसळ लपवले आणि तो गर्भवती स्त्री वेषात त्यांच्यातल्या एका ऋषी समोर उभा राहिला आणि विचारले ” मला मुलगा होईल की मुलगी?” त्या महात्म्याने या अक्षम्य चेष्टेस ओळखली. जराही विचलित न होता ते ऋषीराज म्हणाले. या “गर्भातून जो जन्म घेईल तो यादव वंशाच्या सर्वनाशाचे कारण बनेल.” ऋषिंनी क्रोधित होऊन सांबास शाप दिला कि, तो एका लोखंडी बाणास जन्म देशील आणि ज्यामुळे यादवकुळ आणि साम्राज्याचा विनाश होईल.
यावेळेस येतो याचा प्रत्यय:
जगन्नाथ पुरी मंदिरातील तीन मूर्ती दर 12 वर्षांनी बदलल्या जातात. जुन्या मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती बसवल्या जातात. मूर्ती बदलण्याच्या या प्रक्रियेशी संबंधित एक मनोरंजक किस्साही आहे. मूर्ती बदलताना संपूर्ण शहरातील वीज खंडित होते आणि मंदिराचा परिसर अंधारात असतो. मंदिराबाहेर सीआरपीएफची सुरक्षा तैनात आहे. मंदिरात कोणालाही प्रवेश बंदी आहे. मंदिरात फक्त त्या पुजार्यालाच प्रवेश दिला जातो ज्याला मूर्ती बदलायच्या आहेत.
पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टीही बांधली जाते. हातावर हातमोजे घातले जातात. त्यानंतर मूर्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. जुन्या मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती बसवल्या जातात, पण एक गोष्ट अशी आहे जी कधीही बदलत नाही, ती म्हणजे ब्रह्म पदार्थ. जुन्या मूर्तीतून ब्राह्मणाचा पदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.