Monsoon Tourism esakal
टूरिझम

Monsoon Tourism : पावसाळ्यात पर्यटनाला जाताय? मग, 'या' गोष्टींचा अनुभव नसेल तर उद्भवू शकतो धोका!

दुर्गम, एकांताच्या ठिकाणी जाताना अनुभव नसेल तर धोकादायक ठरू शकते.

सकाळ डिजिटल टीम

ट्रेक एक दिवसाचा असला तरी समवेत चांगली टॉर्च ठेवा. आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या समवेत घ्या. पावसाचा पूर्वअंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करा.

Monsoon Tourism : पावसाळा सुरू झाला की, बरसणाऱ्या धारांचा, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायची स्वाभाविकच इच्छा निर्माण होते. मात्र पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना आपण स्वत:साठी आणि दुसऱ्यांसाठीही कोणती काळजी घ्याल!

जवळचं ठिकाण निवडा. तिथे सुटीदिवशी (Holiday) किंवा वीकेंडला प्रचंड गर्दी होत असेल तर टाळा. निर्जन ठिकाणी जाताना अवघड ठिकाणी जाताना तिथल्या सुरक्षिततेचा विचार प्राधान्याने करा. दुर्गम, एकांताच्या ठिकाणी जाताना अनुभव नसेल तर धोकादायक ठरू शकते. ‘थ्रील’साठी न झेपणाऱ्या गोष्टी टाळा. त्यामुळे ज्या ठिकाणी फिरायला जायचा विचार आहे, तिथली माहिती काढणे, तिथल्या सोयी-सुविधा आणि कोणती तयारी लागेल, याचा विचार आधी करा.

धबधबा (Waterfall), दऱ्या यांसारख्या ठिकाणी ‘सेल्फी’ घेण्यासाठी किंवा ‘रील्स’ बनवण्यासाठी नको ते धाडस करणे टाळायला हवे. निसरड्या धबधब्यांच्या ठिकाणी जाणे, अनोळखी जंगलातून भ्रमंती करणे पूर्णपणे टाळा. मानवी चुकांमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळा. ओळखीच्या व अनुभवी ग्रुप समवेत ट्रेकला जा. ट्रेकर्सची संख्या मर्यादित ठेवा. प्रथमोपचार साहित्य समवेत ठेवा. ट्रेकचे टाईमटेबल कुटुंबीयांकडे माहितीसाठी ठेवा. ट्रेक करताना पहिला आणि शेवटचा माणूस आधीच निश्‍चित करून चालणे सुरू करावे.

ट्रेक एक दिवसाचा असला तरी समवेत चांगली टॉर्च ठेवा. आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या समवेत घ्या. पावसाचा पूर्वअंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करा. पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. धुक्यात वावरताना सावधानता बाळगा. किल्ल्यांवरील तट, दरवाजे, अन्य पडीक अवशेषांवर चढू नका, एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो. सोबत आधारासाठी लाठी ठेवा. त्यामुळे चढणे, उतरणे व चालणे सोपे होते. शेवाळलेल्या जागा व पायऱ्यांवर जपून चालावे. ट्रेकिंग फोटो स्रोत ठेवा. आपत्कालीन स्थितीत उपयोग व्हावा, म्हणून मोबाईलची बॅटरी जपून वापरा.

दुर्गम ठिकाणी फोटो किंवा ‘सेल्फी’ घेणे टाळा. शहरी गोंगाट या ठिकाणी करू नये. किल्ल्यावर, जंगलात, धबधब्यांजवळ कचरा करू नका. आपला निसर्ग आपणच स्वच्छ ठेवा. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास समजून येत नाही. अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती असते. तेव्हा पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नका. धबधब्याच्या प्रपातासोबत वरून दगड पडण्याची शक्यता असते. डोहात, धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ शकतो. त्यात उतरणे टाळावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT