Best Places to Visit : आपल्या देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य म्हणून राजस्थान या राज्याला ओळखले जाते. 'पिंक सिटी' म्हणून ही हे राज्य जगभरात सुप्रसिद्ध आहे. देशातील कानाकोपऱ्यातील लोक आणि विदेशातील अनेक पर्यटक खास फिरण्यासाठी राजस्थानला येतात. त्यामुळे, १२ ही महिने राजस्थानमध्ये पर्यटकांची गर्दी असते.
राजस्थानमधील जयपूर, उदयपूर, जैसलमेर आणि जोधपूर ही शहरे तेथील हवेली, किल्ले, तलाव आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनांसाठी खास ओळखली जातात. परंतु, एवढ्यापुरतेच राजस्थानचे सौंदर्य मर्यादित नाही. या राज्यात असलेले घाट प्रदेश राजस्थानच्या सौंदर्यात भर घालतात.
आज आपण 'राजस्थानचे दार्जिलिंग' अशी खास ओळख असलेल्या ठिकाणाबद्दल आणि इतर निसर्गसंपन्न ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी प्लॅन नक्कीच बनवू शकता.
हा राजस्थानातील सर्वात सुंदर आणि मनमोहक घाट परिसर आहे. या घाटातील दरीमधील निसर्ग सौंदर्य लोकप्रिय आहे. या मनमोहक दरीखोऱ्यातील प्रदेशाला तेथील लोक राजस्थानचे दार्जिलिंग म्हणून ओळखतात.
हा सुप्रसिद्ध घाट राजस्थानच्या मारवाड आणि मेवाडच्या सीमेवर आहे. लाखो निसर्गप्रेमींसाठी हा जणू स्वर्गच आहे. हा घाट परिसर अरवली पर्वतराजीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेला आहे.
त्यामुळे, येथील नजारा पाहण्यासारखा आहे. या घाटातून जाणारी लोकल ट्रेन या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालते. कारण, ट्रेनमधून या घाटाचे नेत्रदीपक सौंदर्य अनुभवायला मिळते. त्यामुळे, पर्यटकांची या ठिकाणी नेहमीच गर्दी असते.
राजस्थानची राजधानी म्हणून जयपूरला ओळखले जाते. यासोबतच पिंक सिंटी म्हणून या शहराची खास ओळख आहे. या शहराला देशी-विदेशी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.
येथील हवा महल, जंतर-मंतर, नाहरगड किल्ला, जलमहाल आणि मानसागर तलाव प्रसिद्ध ठिकाणे आहेत. या ठिकाणी पर्यटक नेहमीच भेट देतात. परंतु, अनेकांना जयपूर स्थित असलेल्या कनक घाट परिसराबद्दल पुरेशी माहिती नाही.
हा परिसर कनक व्हॅली म्हणून ओळखला जातो. जयपूर शहराच्या निसर्ग सौंदर्यात भर घालण्याचे काम हा परिसर करते. खरे तर या व्हॅलीचे आता एका उद्यानात रूपांतर झाले आहे.
त्यामुळे, अनेक लोक येथे फिरायला आणि पिकनिकला येतात. येथील साहसी खेळांचा ही तुम्ही आनंद घेऊ शकता. त्यामुळे, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हे ठिकाण देखील बेस्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.