तयारी अमरनाथ यात्रेची Esakal
टूरिझम

Amarnath Yatra करताय? मग प्रवासामध्ये या वस्तू नक्की सोबत न्या, अडचणींमध्ये येतील कामी

अमरनाथ यात्रेला जर तुम्ही पहिल्यांदा जात असाल तर तुम्हाला या यात्रेविषयी आणि प्रवासात येऊ शकणाऱ्या विविध समस्यांची कल्पना असणं गरजेचं आहे. संपूर्ण माहिती घेऊन तुम्ही संपूर्ण तयारीने अमरनाथ यात्रेला निघाल्यास तुमचा प्रवास नक्की चांगला आणि सुकर होवू शकतो

Kirti Wadkar

दरवर्षी भारतातील हजारो भक्त बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी अमरनाथ यात्रेमध्ये Amarnath Yatra सहभागी होत असतात. यंदा अमरनाथ यात्रा ही ६२ दिवसांची आहे. १ जुलैपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. Tourism Tips Know about preparation for Amarnath Yatra

हिंदू धर्मामध्ये Hindu Religion अमरनाथच्या यात्रेला मोठं महत्व आहे. यासाठीच देशातीलच नव्हे तर परदेशातीलही असंख्य शिव-पार्वती भक्त या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सामिल होत असतात. अमरनाथ यात्रेचा Amarnath Yatra प्रवास हा अत्यंत कठीण आहे. जवळपास १३ हजार फूट उंचीवर असलेल्या या गुफेपर्यंत पोहचण्यासाठी भक्तांना अनेक अडथळे पार करावे लागतात.

अमरनाथ यात्रेला जर तुम्ही पहिल्यांदा जात असाल तर तुम्हाला या यात्रेविषयी आणि प्रवासात येऊ शकणाऱ्या विविध समस्यांची कल्पना असणं गरजेचं आहे. संपूर्ण माहिती घेऊन तुम्ही संपूर्ण तयारीने अमरनाथ यात्रेला निघाल्यास तुमचा प्रवास नक्की चांगला आणि सुकर होवू शकतो.

अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वी तुम्ही पूर्वी अमरनाथ यात्रा आधी केलेल्यांकडून किंवा ऑनलाईन यात्रेची माहिती मिळवू शकता. त्यासाठी लागणारी कागदपत्रं, प्रवासाचे मार्ग, खर्च याची संपूर्ण माहिती घ्यावी. त्याचसोबत तुम्ही शारिरीकदृष्ट्या फिट असणं अत्यंत गरजेचं आहे.

अमरनाथ यात्रेपूर्वी तुम्ही आवश्यक आणि महत्वाच्या वस्तूंची एक यादी तयार करावी. या वस्तू सोबत नेल्यास तुमचा प्रवास सोपा होईल. अमरनाथ यात्रेसाठी कोणत्या वस्तू गरजेच्या आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

जम्मू काश्मिरमध्ये Jammu Kashmir या काळामध्ये थंड वातावरण असल्याने उबदार कपडे सोबत बाळगावे. तसंच या ठिकाणी जुलै आणि ऑगस्टच्या काळात अनेकदा हवामानाची शक्यता वर्तवणं कठीण असतं. अनेकदा पावसाची शक्यता असते. त्यादृष्टीने जास्त कपडे सोबत बाळगावे.

खास करून थंडीपासून बचाव करण्यासाठी जॅकेट, टोपी, हातमोजे, मोजे, शाल अशा गोष्टी सोबत नेण्यास विसरू नका.

अनेकदा मार्गामध्ये मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी तुमचं सामान भिजू नये म्हणून सामानासाठी वॉटरप्रूफ बॅग घ्यावी.

प्रवासात अनेक ठिकाणी भात, आमटी किंवा नाश्ता पुरवला जातो. मात्र तरी तुम्ही काही कोरडा खाऊ सोबत घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा. अनावश्यक वस्तू सोबत नेणं टाळा. यामुळे बॅग जास्त वजनदार होवून प्रवास करणं कठिण होवू शकतं.

तसंच पावसाळी किंवा खास ट्रेकिंगसाठीचे फूटवेअर म्हणजेच बूट घालणं गरजेचं आहे.

बॅगेमध्ये एक लहानसं फर्स्टएड किट ठेवावं. ज्यामध्ये आवश्यक औषधं तसंच ऑक्सिजन स्प्रे तुम्ही ठेवू शकता. यात अंगदुखी, डोकेदुखीची औषधं, तसंच स्प्रे सोबत नेऊ शकता. त्याचप्रमाणे जखमेवर लावण्यासाठीचं एखादं मलम आणि पट्टी ठेवा.

इथं सार्वजनिक शौचालयचा वापर करावा लागत असल्याने सोबत सॅनिटायझर, साबण, नॅपकिन, टिश्यू पेपर असं साहित्य सोबत ठेवा.

हे देखिल वाचा-

चेहऱ्याला लावण्यासाठी सनस्क्रिन लोशन तसंच मॉइश्चराइझर आणि लीप बाम त्याचसोबत मच्छर आणि किड्यांना दूर पळवणारा एखादा स्प्रे किंवा लोशन सोबत न्या.

बलताल, पंचतरणी आणि गुफेच्या भागामध्ये बीएसएनएल BSNL व्य़तिरिक्त इतर कोणतही नेटवर्क नसल्याने घरून निघताना सोबत एखादं BSNLचं सीम कार्ड न्यावं.

सोबत तुमचं एखादं ओळखपत्र न्या. ओळखपत्रासोबत तुमच्या सहकाऱ्यांची तशीच घरातील एखाद्या कुटुंबियाची माहिती लिहिलेली चिठ्ठी ठेवा. यात त्या व्यक्तीचं नाव आणि नंबर तसंच पत्ता लिहून ठेवा.

अमरनाथ यात्रेसाठी कधीही ग्रुपमध्ये जाणं जास्त उपयुक्त ठरतं. एकमेकांच्या मदतीने सामानाची जुळवाजुळव करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT