केरळ ट्रीप Esakal
टूरिझम

Tourism जायफळ आणि दालचिनीसाठी प्रसिद्ध आहे केरळचं हे ठिकाण, ट्री हाऊसमध्ये राहण्याची मजाही लुटा

जर तुम्हाला एखादा विकेण्ड Weekend हिल स्टेशनला निसर्गाच्या कुशीत घालवायचा असेल किंवा एखादी थरारक सफर करायची असेल तर केरळमधील थेक्कडी इथं नक्की भेट द्या

Kirti Wadkar

भारतातील पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यांमध्ये केरळ Kerala हे एक राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. खरं तर संपूर्ण केरळमध्ये भेट देण्यासाठी आणि फिरण्यासाठी अनेक निसर्गरम्य आणि धार्मिक स्थळं आहेत. Tourist Destination information in Marathi know this place in Kerala famous for tree houses

मात्र जर तुम्हाला एखादा विकेण्ड Weekend हिल स्टेशनला निसर्गाच्या कुशीत घालवायचा असेल किंवा एखादी थरारक सफर करायची असेल तर केरळमधील थेक्कडी इथं नक्की भेट द्या. थेक्कडी हे केरळमधील पर्यटनासाठी एक लोकप्रिय डेस्टिनेशन Tourist Destination आहे.

इडुकी जिल्ह्यामध्ये असलेल्या या ठिकाणी पेरियार राष्ट्रीय उद्यान देखील आहे. हे ठिकाण निर्सग सौंदर्यासोबतच तिथल्या ट्री हाऊससाठी Tree House ओळखलं जातं. ट्री हाऊस, टायगर रिजर्वसोबतच इथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत.

कशासाठी प्रसिद्ध आहे थेक्कडी?

थेक्कडी हे ठिकाण निसर्गसौदर्यसौबतच तिथल्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. वाघांसोबतच इथं इतर वन्य प्राणी, पक्षी आणि विविध वनस्पतींच्या दुर्मिळ प्रजाती आढळतात. इथे हत्ती, मकाक, हरण, बिबट्या, रानडुक्कर, मलबार ग्रे हॉर्नबिल, व्हाइट-बेल्ड ब्लू फ्लाइकॅचर, सनबर्ड, ग्रेट हॉर्नबिल, ब्लॅक स्टॉर्क असे पक्षी आढळतात. इथल्या पेनियार या घनदाट अभयरण्यातून नंदिया आणि पंबा या दोन नद्या वाहतात.

गरम मसाल्यांचं घर

पर्यटन स्थळांसोबतच थेक्कडी हे गरम मसाल्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथं इलायची, दालचिनी, काळी मिरी, बडीशेप, लवंग तसचं व्हॅनिलाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. इथं भेट दिल्यानंतर तुम्ही इथल्या मसाल्यांनी बनलेल्या विविध पदार्थांचा स्वाद चाखू शकता. तसचं ट्री हाऊसमध्ये राहण्याची मजा लुटू शकता.

हे देखिल पहा-

थेक्कडीमध्ये फिरण्यासारखी ठिकाणं

पेरियार वन्यजीव अभयारण्य- जर तुम्हाला रोमांच आणि वन्य सफर करून प्राणी पाहण्याची आवड असेल तर तुम्ही पेरियार अभयारण्याला नक्की भेट देऊ शकता. हे अभयारण्य पेरियार नदीच्या तटावर आहे. इथं तुम्ही राफ्टिंगचा देखील आनंद घेऊ शकता.

कुमली- थेक्कडीपासून चार किलोमीटर दूर असलेल्या कुमली इथं गरम मसाल्यांचे मळे आहेत. हे ठिकाण स्पाइस ट्रेडिंगसाठी प्रसिद्ध आहे. चहासोबत विविध गरम मसाल्यांच्या मळ्यांमधून फेरफटका मारायचा असेल तर तुम्ही कुमली या ठिकाणाला भेट देऊ शकता. इथलं निसर्ग सौदर्य मनाला शांती देणारं आहे.

मुरीक्कडी- केरळमधील एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणजे मुरीक्कडी. हे थेक्कडीपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे. या प्रवासात तुम्ही लवंग, हळद आणि व्हॅनिलाच्या मळ्यांचं सुंदर दृश्य अनुभवू शकता.

परियार अभयारण्य- पेरियार अभयारण्यात तुम्ही एक रोमांचक सफर करू शकता. इथं पेरियार नगदीच्या काठावर तुम्हाला विविध पक्षी पाहायला मिळतील. तसचं वन्य प्राणी पाहता येतील. इथं तुम्ही राफ्टिंगची मजा देखील लूट शकता.

थेक्कडी जलाशय- पेरियार अभयरण्याजवळच असलेल्या थेक्कडी जलाशयाला देखील तुम्ही भेट देऊ शकता. इथंलं निसर्ग सौंदर्य भुरळ घालणारं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT