Trampoline Park esakal
टूरिझम

Trampoline Park : लहानपण मनमुराद जगता येईल अशा पुण्यातील ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये एक टूर तो बनती है!

पार्क म्हटलं की आठवतं ते आपलं मनमुराद बालपण

सकाळ डिजिटल टीम

Trampoline Park : पार्क म्हटलं की आठवतं ते आपलं मनमुराद बालपण; साधारण रविवारी आरामात उठायच, आवरायच, आईच्या हातच काहीतरी चमचमीत खायच आणि बाबांचा हात धरून छान जवळच्या गार्डनमध्ये खेळायला जायच. मध्येच भूक लागली तर तिथलीच भेळ पुरी, पाणी पुरी खायची आणि परत नुसता दंगा करायचा.

पण जस जस वय वाढत तसं तसं गार्डनमध्ये खेळणं कमी होतं आणि मग आपल्या व्यापात अडकलो की उरते ती फक्त परत थोडा वेळ खेळता येयला हवं ही हुरहूर. तुमची ही हुरहूर आता संपू शकते. कारण पुण्यात असंच बालपण जगता येईल असं ओपन फॉर ऑल असं पार्क उघडल आहे.पुण्यामध्ये कात्रजजवळ हायवेवर फ्लाईंग पांडा नावाच ट्रॅम्पोलिन पार्क उघडल आहे आणि इथे तुम्ही आपल्या वयाच कोणतंही भान न ठेवता मनमुराद खेळू शकतात.

ट्रॅम्पोलिन पार्क म्हणजे नक्की काय?

तुम्हाला ट्रॅम्पोलिन तर माहितीच आहे, एक अशी मॅट जीच्यावर उडी मारून आपण बाऊन्स होऊन अजून उंच उडू शकतो. अशा मॅट बघून साहजिकच तिचं आकर्षण होतं. या पार्कमध्ये तुम्हाला अशा अनेक मॅट मिळतील. यावरती तुम्ही खूप खेळू शकतात. डान्स करू शकतात, आणखीनही अडवेंचर्स तुम्हाला ट्रॅम्पोलिन पार्क मध्ये खेळता येईल.

या पार्क मध्ये वयाची अट नाही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खेळू शकतात, लहान मुलांसाठी वेगळा असा एरिया सुद्धा आहे. इथे फुटबॉल टर्फ सुद्धा आहे. ज्यावर तुम्ही खेळू शकतात. शिवाय इथे बाॅलिंग सुद्धा करता येईल. याच जागेमध्ये फूड कोर्ट सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही इथे चमचमीत खाऊ सुद्धा खाऊ शकतात.

पेमेंट डिटेल्स

यासाठी तुम्हाला कोणतीही प्री बूकिंग करण्याची गरज नाही. तुम्ही सकाळी 11 ते रात्री 10 यावेळेत कधीही इथे जाऊ शकतात. या पार्कमध्ये वावरण्यासाठी आपल्याला आपले शूज घालता येत नाही, त्यासाठी त्यांचे स्वतःचे वेगळे सॉक्स आहेत ते घ्यावे लागते. जे आपण नंतर घरीही घेऊन जाऊ शकतो, वीक डेज मध्ये इथे 700 रुपये प्रति तास तर वीकेंडला 800 रुपये प्रति तास असे रेट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT