तुम्ही बोरींग रुटीनमूळे कंटाळला असाल तर तूमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. येत्या नवरात्रीमध्ये तुम्हाला एक लाँग विकेंड मिळणार आहे. येत्या 5 ऑक्टोबरला दसरा साजरा होत आहे. 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर असा लाँग वीकेंड मिळणार आहे.
नवरात्री अगदी तोंडावर आली आहे. यावेळी 26 सप्टेंबरला घटस्थापना असून 5 ऑक्टोबरला दसरा आहे. यावेळी तुम्हाला शनिवार ते बुधवार असा बराच वेळ मिळणार आहे. देशात काही ठिकाणी दसरा अतिशय खास पद्धतीने साजरा केला जातो. तुम्ही यापैकी काही ठिकाणी लाँग वीकेंडचा प्लॅन करू शकता. चला तर मग जाणून घेऊया दसऱ्यासाठीच्या या खास ठिकाणांबद्दल.
कोलकाता - दुर्गा उत्सव आणि दसरा
कोलकात्याचे खरे सौंदर्य दुर्गापूजेतून दिसते. कोलकत्यात नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी सिंदूर खेळला जातो. त्याचप्रमाणे तुम्ही जर खाद्यप्रेमी असाल तर हे तूमच्यासाठी हे बेस्ट ठिकाण असू शकते. फटाके,ढोल ताशे, नृत्य आणि दुर्गा मातेची मिरवणूक हे सर्व विलोभनीय आहे.
म्हैसूर शाही दसरा सोहळा
म्हैसूर येथील दसरा सण साजरा करण्याची प्रथा 400 वर्षे जुनी आहे. कर्नाटकमध्ये राज्यासाठी हा सण खूप खास मानला जातो. या सोहळ्याला म्हैसूरचे राजघराणेही येथे सहभागी होते. येथे दसरा संपूर्ण 10 दिवस साजरा केला जातो. यावेळी केलेल्या विद्युत रोषणाईने संपूर्ण म्हैसूर पॅलेसही उजळून निघातो. दररोज संध्याकाळी येथे अनेक कार्यक्रम आणि लोकनृत्ये होतात. येथे कर्नाटकची संस्कृती आणि संगीत या दोन्हींचे मिश्रण पाहायला मिळेल. येथे हत्तींची रॅलीही काढली जाते.
कुल्लू
कुल्लूमध्येही दसऱ्याला शाही उत्सव होतो. कुलूमध्ये देवदेवतांच्या मूर्ती डोक्यावर घेऊन जातात. मुख्य रघुनाथ मंदिरात सर्व देवतांची पूजा केली जाते. इथले मंदिरही खूप खास आहे. येथे रावणाची लंका दहन करण्याची प्रथा देखील आहे. लोक इथे वेगवेगळ्या वेषात येतात आणि हा सण साजरा करतात.
गुजरात - नवरात्री पूजा
नवरात्री गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. प्रत्येक शहरात तुम्हाला नवरात्री आणि दसऱ्याचे अनोखे रूप पाहायला मिळेल. गरबा डान्स सर्वत्र पाहायला मिळेल. रावण दहनालाही येथे खूप महत्त्व दिले जाते. प्रत्येकजण पारंपारिक पोशाखात गरबा खेळताना दिसतो.
वाराणसी रामलीला आणि रावण दहन
दिल्लीतील रामलीला मैदानातील रावण दहन प्रसिद्ध आहे. तर, वाराणसीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या रामनगरमध्ये सर्वात प्रसिद्ध रामलीला साजरी केली जाते. ही रामलीला काशीच्या राजाने सुरू केली असे मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.