Tourist Places in India Sakal
टूरिझम

Travel Destinations in Budget: ऑक्टोबर महिना फिरण्याचा; पण कमी खर्चात जायचं कुठे? उत्तर इथे वाचा...

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून ब्रेक घेण्यासाठी ही ठिकाणं अगदी उत्तम आहेत.

वैष्णवी कारंजकर

ऑक्टोबर महिना म्हणजे थंडीची चाहूल देणारा महिना असतो. हा महिना पर्यटनासाठी सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात, या काळात पाऊसही विशेष पडत नाही आणि जास्त ऊनही नसतं. त्यामुळे वातावरण आल्हाददायक असतं. अशा वातावरणामध्ये जर तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनातून ब्रेक घ्यायची इच्छा झाली, तर त्यात काही नवीन नाही.

आज आम्ही तुम्हाला काही पर्यटनस्थळांबद्दल सांगणार आहोत. इथे फिरायला जाणं फारसं महागडंही नाही, त्यामुळे बजेटची चिंता तुम्हाला सतावणार नाही. तसंच ऑक्टोबर महिन्यात इथलं वातावरणही प्रसन्न असतं. तेव्हा जाणून घ्या या ठिकाणांबद्दल...

मॅक्लॉडगंज

हिमाचल प्रदेशातील मॅक्लॉडगंज ही ऑक्टोबर महिन्यात फिरण्यासाठी उत्तम जागा आहे. वाकड्या तिकड्या वाटा, उंच उंच झाडं या सगळ्यामुळे तुमचा फिरण्यातला आनंद नक्कीच द्विगुणित होईल. इथल्या हवेमुळे वातावरणामुळे तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल. इथे दलाई लामा यांचं निवासस्थानही आहे. या भागामध्ये अनेक चांगली हॉटेल्स, रेस्तराँ आहेत. तसंच इथे पॅराग्लायडिंगची मजाही तुम्ही घेऊ शकता. या भागामध्ये नामग्याल मठ, भागसू धबधबा, त्सुगलगखांग, त्रिऊंड, धर्मशाला आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टे़डिअम अशा ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या.

चित्तौडगढ

हे एक खूप जुनं शहर आहे. इथे असणारा किल्ला हे इथलं महत्त्वाचं प्रेक्षणीय स्थळ होय. हा किल्ला जवळपास ७०० एकरामध्ये पसरलेला आहे. हा किल्ला मध्ययुगातल्या रक्तपाताचा साक्षीदार आहे. हा किल्ला शौर्य़ आणि बलिदानाचं प्रतीक आहे. ही जागा श्रीकृष्ण भक्त संत मीराबाई यांच्याशी तसंच राणी पद्मावतीशी नातं सांगते. ऑक्टोबर महिन्यात फिरण्यासाठी हे ठिकाणही उत्तम आहे.

उदयपूर

झऱ्यांचं शहर म्हणजे उदयपूर. भारतातल्या रोमँटिक शहरांपैकी एक हे शहर. इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. इथल्या प्राचीन हवेली, महाल, घाट आणि मंदिरे यांना भेटी देतात. तुम्ही या शहरामध्ये येऊन सिटी पॅलेस, महाराणा प्रताप स्मारक, जग मंदिर, फतेह सागर झरा आणि पिछोला झरा अशा गोष्टी पाहू शकता. इथे खाण्यापिण्याचे अनेक चांगले स्पॉट्स आहेत, तसंच फिरण्यासाठी चांगल्या जागाही आहेत. शिवाय ही ट्रीप अगदीच बजेटमध्ये होणारी आहे.

पंचमढी

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे एक सुंदर थंड हवेचं ठिकाण आहे. ही जागा छोटी असली तरीही इथं बघण्यासारखं खूप काही आहे. इथे तुम्ही आठवडाभर छान वेळ घालवू शकता आणि इथल्या निसर्गाचा आस्वाद घेऊन शकता.इथे जटाशंकर गुंफा, बी फाल, अप्सरा विहार, हांडी खोह अशा ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.

मसूरी

मसूरी दिल्लीपासून जवळपास २८० किलोमीटर दूर आहे. इथे तुम्ही कमी खर्चामध्ये केम्प्टी धबधबा, देव भूमी वॅक्स म्युझियम, धनोल्टी, सोहम हेरिटेज अँड आर्ट सेंटर, जॉर्ज एव्हरेस्ट हाऊस, एडव्हेंचर पार्क, ख्रिस्त चर्च, भट्टा धबधबा, मोसी धबधबा, गन हिल, अशी अनेक ठिकाणे पाहू शकता. इथे तुम्हाला कॅमेरा १२०० ते १५०० रुपयांमध्ये मिळेल. जर तुम्ही आधीच बुकिंग केलं तर याहून ही स्वस्त मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT