Singapore esakal
टूरिझम

लाॅकडाउनला कंटाळात, फिरायला जायचा प्लॅन आहे? मग, सिंगापूरला जरुर भेट द्या..

बाळकृष्ण मधाळे

सातारा : कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन आहे?, कोणत्या पर्यटन स्थळाची शोधाशोध करताय? मग, ही बातमी आवर्जुन वाचा.. आपण कोणत्याही ठिकाणाला भेट देण्यापूर्वी तेथील वातावरण, हॉटेल, रिसॉर्ट या आदींबाबत खातरजमा केली पाहिजे आणि ते ठिकाण खरंच आपल्यासाठी सुरक्षित आहे का? याची देखील चौकशी केली पाहिजे. परंतु, आम्ही तुम्हाला अशाच एका खास पर्यटनाबद्दल माहिती सांगणार आहोत, जे कदाचित तुम्हालासुध्दा माहिती असेल, नाही का? चला, तर मग.. आपण सिंगापूरबद्दल जाणून घेऊ.. (Travel Destinations Tourist Places In Singapore You Must With Your Family)

कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन आहे?, कोणत्या पर्यटन स्थळाची शोधाशोध करताय? मग, ही बातमी आवर्जुन वाचा..

सिंगापूर फ्लायर - Singapore Flyer

आपल्याला उंचावरून सिंगापूरचा आनंद घ्यायचा असेल, तर सिंगापूर फ्लायरपेक्षा चांगली जागा असू शकत नाही. सिंगापूर फ्लायर हा एक प्रकारचा व्हील आहे. जो सिंगापूर देशाची आपल्याला सफर घडवतो. विविध दृश्यांचा आनंद घेण्यासाठी 360 अंशांच्या वरती जाऊन आपल्याला आनंद देतो. हा व्हील जगातील सर्वात उंच व्हील आहे. आपल्यात चांगलं धाडस असल्यास, या व्हीलवर बसून आपण रात्रीचा देखील आनंद घेऊ शकता. रात्री या व्हीलवर बसून संपूर्ण सिंगापूर देखील पाहू शकता. तसेच या सिंगापूर फ्लायरवरुन मलेशिया आणि इंडोनेशिया देशाची देखील आपल्याला एक वेगळी झलक पहायला मिळेल.

Singapore Flyer

चायना टाउन - ChinaTown Singapore

चायना टाउनसारख्या झगमगाटाच्या ठिकाणी आपण नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहता. आपण सिंगापुरात सुट्टी एन्जाॅय करत असल्यास, येथील चायना टाउनला जरुर भेट द्या, अन्यथा तुमची संपूर्ण सुट्टी वाया जाईल. येथे आपल्याला बऱ्याच प्रकारचे चीनी खाद्य, आकर्षक दुकाने आणि पारंपारिक चीनी उपकरणं पहायला मिळतील. याशिवाय, आपण येथील प्रसिद्ध हिंदू आणि बुद्ध मंदिरांना देखील भेट देऊ शकता.

ChinaTown Singapore

मर्लायन - Merlion Singapore

सिंगापूरचं राष्ट्रीय प्रतीक असलेलं चिन्ह 'द मर्लायन' अत्यंत लोकप्रिय आहे. जेव्हा आपण ही मूर्ती पाहता, तेव्हा आपल्याला असे दिसून येईल, की ह्या मूर्तीत अर्धा सिंह आणि अर्धा मासा असल्याचा भास होतो. ही मूर्ती मर्लायन पार्कमध्ये स्थित आहे. जर आपण सिंगापूरमध्ये ऐतिहासिक स्थान शोधत असाल, तर या ठिकाणाला आपण जरुर भेट द्यायला हवी.

Merlion Singapore

सेंटोसा द्वीप - Sentosa Island

आपल्याला असं तर वाटत नाही ना?, की सिंगापूरमध्ये फक्त इमारतीच इमारत आहेत? पण, तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण, सिंगापूर हे एक सुंदर बेट देखील आहे. येथील सेंटोसा द्वीप खूपच विलक्षण असून पर्यटकांना नेहमी आकर्षित करीत असतं. या बेटावर आपण खूप मौज-मस्ती करु शकता. येथे आपण डोल्फिन माशाला पोहताना देखील पाहू शकता. या बेटावर सिंगापूरची प्रसिद्ध मूर्ती मर्लायन पाहण्याचा देखील आनंदा घेऊ शकता. येथील सिलोसोचा एकमेव संरक्षित किल्ला देखील खूप लोकप्रिय आहे.

Sentosa Island

युनिव्हर्सल स्टुडिओ - Universal Studio

आपण अनेकवेळा बॉलिवूड चित्रपटांत सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओला पाहिला असाल. या स्टुडिओला पाहण्यासाठी आपल्याला सेंटोसा बेटावर जावं लागेल. कुटुंबासह फिरण्यासाठी ही एक रोमांचकारी जागा असून या स्टुडिओच्या आत सर्वोत्तम रेस्टॉरंट, कॅफे देखील आहे, जिथे आपण आरामशीर भोजन करु शकता. तसेच येथील बाजारात आपण फॅशनेबल कपडे देखील खरेदी करू शकता.

Universal Studio

सिंगापूर चिडीयाघर - Singapore Zoo

सिंगापूरच्या चिडीयाघर या पर्यटनस्थळी ऋतिक रोशन आणि प्रियंका चोप्रा यांच्या 'क्रिश' चित्रपटाचे शूटिंग झाले होते. आपण येथे जिराफ, झेब्रा, वाघ यासह ३०० हून अधिक प्राणी पाहू शकता. तसेच विविध जातीचे भालू आणि कुत्री देखील आपल्याला पहायला मिळतील. येथे आपण नाइट सफर केल्यास उत्तम, कारण येथे रात्री फिरल्यास आपल्याला विविध प्राणी पहायला मिळतील.

Travel Destinations Tourist Places In Singapore You Must With Your Family

Singapore Zoo

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT