Weekend Travel Tips:  Sakal
टूरिझम

Pune Long Weekend Gateways: पुणेकरांनो लॉन्ग विकेंडसाठी बेस्ट आहेत तुमच्या जवळची खास ठिकाणे, कसं जायचं मित्रांना पण सांगा

Weekend Travel Tips: लाँग विकेंडचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुण्याजवळच्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता.

सकाळ वृत्तसेवा

संकलन : भाऊ म्हाळसकर (लोणावळा), दक्ष काटकर (टाकवे बु.).

Plan Weekend Tips: यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे, पाऊस नको-नकोसा झाला होता. पण, आता थोड्या फार श्रावणसरी बरसत आहे. काही वेळा ऊन-पावसाचा खेळ चालत आहे. ऋतू हिरवागार झालाय आणि पर्यटनस्थळांचा आनंद घेणे अधिक मजेदार, सोयीस्कर आणि मस्त अनुभव घेणारे झाले आहे. त्यामुळे, पर्यटकांनो, चला मग अनुभवूया मावळची सफर...

कोराई गड

लोणावळ्याच्या दक्षिणेला सहज जाता येण्यासारखा हा किल्ला आहे. घाटमाथ्यावर असल्यामुळे एकाच वेळी कोकण व देशावरील परिसराचे विस्तृत दर्शन घडते. तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यावर कोराईदेवीचे मंदिर व मोठे तळे पाहण्यासारखे आहे. बुरुजावरुन कोकणातील मुलखाचे विहंगम दृश्य दिसते. तसेच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा आणि माणिकगड असा सर्व परिसर पाहता येतो.

मार्ग : लोणावळा - आंबवणे - पेठ शहापूर - कोराईगड

लोणावळ्यावरून अंतर : २४ किलोमीटर

आपत्ती व्यवस्थापन : ९८२२५ ००८८४

लोणावळा पोलिस स्टेशन : ०२११४ २७३०३३

राजमाची किल्ला

राजमाची किल्ला

राजमाची किल्ला हा लोणावळ्याच्या उत्तर-पश्चिमेस सतरा किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. प्रत्यक्षात श्रीवर्धन आणि मनरंजन ही किल्ल्यांची स्वतंत्र जोडगुळी आहे. निसर्गाचे वरदान, डोंगर, दऱ्या-खोऱ्यांनी, धबधब्यांनी समृद्ध दृश्य अनुभवता येते. राजमाची तलाव, शिव मंदिर लक्षणीय.

मार्ग : लोणावळा - कुणेनामा - डेला - उधेवडी - राजमाची असे जाता येते.

कार्ला लेणी

कार्ला लेणी

कार्ला लेणी प्राचीन बौद्ध दगडी लेण्यांचा समूह आहे. चैत्य हॉल, स्तूप, शिलालेख, सुंदर कोरलेले प्रवेशद्वार आणि शिल्पे प्रेक्षणीय आहे. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान एकविरा देवी मंदिर लेण्यांच्या सान्निध्यात वसले आहे.

मार्ग : कार्ला - वेहेरगाव- एकविरा गड असे जाता येते

लोणावळा शहर पोलिस स्टेशन : ०२११४ - २७३०३३

लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन : ०२११४ - २७३०३६

शिवदुर्ग मित्र : ९९२२५००८८४

लोणावळा-खंडाळा

लोणावळा-खंडाळा

लोणावळा आणि खंडाळा हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाट रांगेतील पुणे आणि मुंबई शहरांच्या मध्यभागी वसलेले निसर्गाचे वरदान लाभलेले महत्वाचे हिल स्टेशन आहे. भुशी, तुंगार्ली धरणे, नारायणी धाम मंदिर, वॅक्स म्युझियम, कुणे धबधबा, सनसेट पॉइंट आणि राजमाची पॉइंटसह राजमाची, लोहगड किल्ले आकर्षण आहे.

मार्ग : जुना मुंबई पुणे महामार्ग, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, रेल्वे मार्गाने याठिकाणी पोचता येते

लोणावळा शहर पोलिस स्टेशन : ०२११४ - २७३०३३

लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन : ०२११४ - २७३०३६

शिवदुर्ग मित्र : ९९२२५००८८४

विसापूर गड

विसापूर गड

विसापूर किल्ला हा लोणावळ्याजवळील एक लोकप्रिय डोंगरी किल्ला आहे. प्रसिद्ध असलेल्या किल्ले लोहगड या किल्ल्याच्याच बाजूला हा विसापूर गड आहे. हा गड लोहगड किल्ल्यापेक्षा मोठा आहे आणि उंच आहे. या किल्ल्यावर अनेक गुहा, पाण्याची टाकी, मंदिरे आहेत व छत नसलेल्या इमारती आहेत. किल्ल्यावर शिवमंदिर आहे. गडावर एक भव्य मारुतीचे शिल्प आणि मोठा चुन्याचा घाणा आहे. विसापूर गड हे मुंबई, पुणे या शहरांममधोमध असणाऱ्या लोणावळ्या जवळील ट्रेकिंगचे एक आदर्श ठिकाण आहे.

मार्ग : लोणावळा - दुधिवरे खिंड - लोहगड गाव - विसापूर गड

लोणावळ्यावरून अंतर : १५ किलोमीटर

आपत्ती व्यवस्थापन : ९८२२५ ००८८४

लोणावळा पोलिस स्टेशन : ०२११४ २७३०३३

भाजे लेणी

भाजे लेणी

भाजे लेणी हा भारतातील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या २२ प्राचीन दगडी लेण्यांचा समूह आहे. भाजे लेणी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा आहे आणि इतिहासप्रेमी, प्राचीन स्थापत्यकला अभ्यासकांसाठी पर्वणीचे ठिकाण.

मार्ग : कार्ला - मळवली- भाजे असे जाता येते

लोणावळा शहर पोलिस स्टेशन : ०२११४ - २७३०३३

लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन : ०२११४ - २७३०३६

शिवदुर्ग मित्र : ९९२२५००८८४

लायन्स पॉइंट

कोकणाचे नयनरम्य दर्शन घडविणारे साकुर पठार सातत्याने खुणावत आहे. सध्या हे ठिकाण टायगर, लायन्स पॉइंट या नावाने ओळखले जाते. लोणावळ्याच्या पश्चिमेस सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी टेकड्या, दऱ्या आणि धबधबे आणि कोकणाचे विहंगम दृश्य येथून नजरेस येते. भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात, जून ते सप्टेंबर दरम्यान येथे सुंदर हिरवेगार लँडस्केप तयार होतात. स्वतःच्या वाहनाने जाता येते. रिक्षा आणि एसटी बसची ही सोय.

मार्ग : जुना मुंबई पुणे महामार्ग, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, रेल्वे मार्ग असे या ठिकाणी जाता येते.

प्रतिशीर्डी शिरगाव

शिर्डीच्या देवस्थानची आठवण करून देईल अशा स्वरूपात हे मंदिर आहे. भव्य मंदिर, प्रशस्त परिसर, नयनरम्य बाग, साईंचा दरबार, सोनेरी आणि पिवळसर रोषणाई असलेली प्रकाशयोजना, गाभाऱ्यात आरसे आणि सिंहासनावर विराजमान झालेली साईंची संगमरवरी मूर्ती चित्त वेधून घेते. मावळातील प्रतिशिर्डी म्हणून हे मंदिर प्रसिद्ध असून, गुरुवारी भाविकांची संख्या असंख्य असते.

मार्ग : सोमाटणे फाटा - शिरगाव - प्रतिशिर्डी साई मंदिर

सोमाटणे फाट्यावरून अंतर ३ किलोमीटर

आपत्ती व्यवस्थापन : ९८२२५ ००८८४

तळेगाव पोलिस स्टेशन : ०२११४ २२२४४४

प्रतिपंढरपूर (दुधिवरे मंत्र मंदिर)

दुधिवरे खिंडीजवळ ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी साकारलेले हे प्रतिपंढरपूर मंदिर. येथील आध्यात्मिक आणि निसर्गाचा सहवास हवाहवासा वाटणारा आहे. येथील मंत्रमंदिर पाहण्यासारखे आहे. येथून लोहगडचे विहंगम दृश्‍य पाहायला मिळते. किल्यावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

मार्ग : लोणावळा - औंढोली - दुधिवरे खिंड - प्रतिपंढरपूर मंदिर

लोणावळ्यावरून अंतर : १२ किलोमीटर

आपत्ती व्यवस्थापन : ९८२२५ ००८८४

कामशेत पोलिस स्टेशन : ०२११४ २७३०३३३

घटेश्वर मंदिर

ठोकळवाडी धरणाच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर अनेकांसाठी अपरिचित आहे. हे मंदिर केदारनाथ शैलीतील मानले जाते. येथील परिसर शांत आणि सुंदर आहे. मंदिर परिसरातील शांतता मन प्रसन्न करते. आंदर मावळ भागातील या मंदिरात श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी असते.

मार्ग : कान्हे फाटा - टाकवे बुद्रुक- वडेश्वर- शिंदे घाटेवाडी - घटेश्वर मंदिर

कान्हे फाट्यावरून अंतर : २१ किलोमीटर

आपत्ती व्यवस्थापन : ९८२२५ ००८८४

वडगाव पोलिस स्टेशन : ९४२१३ ४०६११

प्रतिशीर्डी शिरगाव

शिर्डीच्या देवस्थानची आठवण करून देईल अशा स्वरूपात हे मंदिर आहे. भव्य मंदिर, प्रशस्त परिसर, नयनरम्य बाग, साईंचा दरबार, सोनेरी आणि पिवळसर रोषणाई असलेली प्रकाशयोजना, गाभाऱ्यात आरसे आणि सिंहासनावर विराजमान झालेली साईंची संगमरवरी मूर्ती चित्त वेधून घेते. मावळातील प्रतिशिर्डी म्हणून हे मंदिर प्रसिद्ध असून, गुरुवारी भाविकांची संख्या असंख्य असते.

मार्ग : सोमाटणे फाटा - शिरगाव - प्रतिशिर्डी साई मंदिर

सोमाटणे फाट्यावरून अंतर ३ किलोमीटर

आपत्ती व्यवस्थापन : ९८२२५ ००८८४

तळेगाव पोलिस स्टेशन : ०२११४ २२२४४४

बेडसे लेणी

मुंबई-पुणे महामार्गावरून पवना धरणाकडे जाताना बेडसे हे गाव लागते. तिथेच डोंगरात १५० मीटर पसरलेल्या खडकात ही लेणी खोदलेली आहेत. साधारण इसवी सन पूर्व पहिल्या ते इसवी सन दुसऱ्या शतकापर्यंत ही लेणी खोदली गेलेली आहेत. ही बौद्ध लेणी हिनयान पंथातील आहेत. भव्य चैत्यगृह, विहार, वेगवेगळे स्तूप आणि पाण्याची टाकी असा समूह आहे. ही लेणी अतिशय देखणी आणि जगप्रसिद्ध आहे.

मार्ग : कामशेत - करुंज - बेडसे गाव - लेणी

अंतर : कामशेतवरून ८ किलोमीटर

आपत्ती व्यवस्थापन : ९८२२५ ००८८४

कामशेत पोलिस स्टेशन : ०२११४ २६२४४०

नागफणी

कुरवंडे गावाशेजारील असलेल्या नागफणी डोंगरावर असलेल्या छोटेशे शिवमंदिर हे स्थानिक आणि गिर्यारोहकांव्यतिरिक्त अनेकांना माहिती नसावे. हे मंदिर नागफणेश्वर म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात हे मंदिर दाट धुक्यात हरवते. येथून अमृतांजन पूल परिसर व मिसिंग लिंक प्रकल्पाचा पूल पाहता येतो. तसेच सध्या चालू असलेला मिसिंग लिंक प्रकल्प याच नागफणी डोंगराखालून गेलेला आहे. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला याठिकाणी भाविकांची मोठी संख्या पाहायला मिळते.

मार्ग : लोणावळा-कुरवंडे गाव-नागफणी डोंगर व मंदिर

लोणावळ्यावरून अंतर : ५ किलोमीटर

आपत्ती व्यवस्थापन : ९८२२५ ००८८४

लोणावळा पोलिस स्टेशन : ०२११४ २७३०३३

विंचू कडा, लोहगड

महाराष्ट्रातील मजबूत गडांपैकी असलेला हा किल्ला पावसाळ्यात स्वर्गच दिसतो. धुके आणि गडभोवताची गर्द झाडी गडाचे सौंदर्य खुलवते. किल्ल्याचा ‘विंचू कडा’ सर्वात आकर्षक भाग आहे. हा भाग विंचवाच्या शेपटीसारखा वाटतो. लोहगड किल्ला ट्रेक हा लोणावळ्यातील सर्वात सुंदर व सोपा ट्रेक मानला जातो, त्यामुळे पर्यटकांची बारमाही गर्दी असते.

मार्ग : लोणावळा- औंढोली- दुधिवरे खिंड-लोहगड गाव- लोहगड किल्ला

लोणावल्यावरून अंतर : १४ किलोमीटर

आपत्ती व्यवस्थापन : ९८२२५ ००८८४

लोणावळा पोलिस स्टेशन ः ०२११४ २७३०३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT