Travel Packing Tips Sakal
टूरिझम

Travel Packing Tips: ट्रीपचा आनंद घेण्यासाठी योग्य पॅकिंग करणे गरजेचे, जाणून घ्या कोणत्या गोष्टी सोबत असव्यात

पुजा बोनकिले

Travel Packing Tips: अनेक लोकांना सुट्ट्यांमध्ये फिरायला जायला आवडते. पण यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवासाचे पॅकिंग असते. अनेकांना प्रवासात काय न्यावे आणि आणि काय नाही हे कळत नाही. यामुळे प्रवासाची मज्जाच खराब होते. हे टाळण्यासाठी पॅकिंग करण्यापूर्वी आवश्यक वस्तूंची यादी बनवावी आणि नंतरच बॅगमध्ये वस्तू ठेवाव्या.

समुद्रकिनारा

तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर तुमचे कपडे शक्य तितके हलके ठेवावे. समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणचे हवामान आल्हाददायक असते, त्यामुळे अशा ठिकाणी फुल स्लीव्हज, जॅकेट, बूट नेण्याची गरज नाही. कॉटन, शिफॉन, जॉर्जेटचे कपडे पॅक करा. यासोबतच फ्लॅट स्लीपर वापरू शकता. हील्स किंवा बूट घालून समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे.

जंगल

तुम्ही कोणत्याही जंगल सफारीसाठी जात असाल तर फुल स्लीव्ह कपडे सोबत घ्यावे. शक्यतो हिरव्या रंगाचे कपडे सोबत ठेवावे. अशा ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी बूट किंवा चांगल्या दर्जाचे शूज सोबत ठेवावे. अनेक वेळा अशा ठिकाणी नेटवर्कची समस्या असते, त्यामुळे तिथे जाण्यापूर्वी पूर्ण व्यवस्था करावी.तसेच बॅटरीसोबत ठेवणे गरजेचे आहे.

हिल स्टेशन

जर तुम्ही हिल स्टेशनवर जात असाल तर पॅकिंग करताना तुम्ही कोणत्या सीझनमध्ये जाणार आहात हे लक्षात ठेवले पाहिजे. मे-जून महिन्यांत हिल स्टेशनवरील हवामान असे असते की तुम्ही सामान्य कपड्यांमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकता, परंतु जर तुम्ही हिवाळ्यात येथे फिरण्याचा विचार करत असाल तर लोकरीचे कपडे सोबत ठेवावे. हिल स्टेशनसाठी तुमच्या बॅगेत चांगल्या दर्जाचे शूज असावे. जर तुम्ही ट्रेक करायचा विचार करत असाल तर पाण्याची बाटली, स्नॅक्स, काठ्या, टॉर्च या गोष्टी बॅगमध्ये असल्या पाहीजे.

पुढील गोष्टी ठेवा लक्षात

जर तुम्ही हॉटेल बुक केले असेल तर तुमच्या सोबत टॉव्हेल, साबण किंवा शॅम्पू घेऊन जाण्याची गरज नाही. कारण आजकाल यासारख्या वस्तूंची सोय हॉटेल रूममध्ये असते.

तसेच प्रवासात पांघरून किंवा बेडशीट सोबत घेऊन जाण्याची गरज नाही. या गोष्टीमुळे बॅग भरून जाते आणि वजन देखील वाढते. हॉटेलमध्ये या गोष्टी दिलेल्या असतात.

प्रवासात असे कपडे सोबत ठेवावे जे वेगवेगळ्या प्रकारे घालू शकाल. ज्यामुळे कपडे वाढणार नाही आणि बॅगचे वजन देखील वाढणार नाही.

प्रवासात औषध आणि महत्वाची कागद पत्रे सोबत ठेवावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT