Historic Vasota Fort esakal
टूरिझम

ट्रेकर्सना खुशखबर! ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेक उद्यापासून सुरू

सूर्यकांत पवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी केला गेला.

कास (सातारा) : महाराष्ट्रभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा (Historic Vasota Fort) ट्रेक शनिवार 23 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा ट्रेक सुरू होत असल्याने पर्यटक व ट्रेकर्स यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात वासोटा किल्ला वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) काळात या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी केला गेला.

औंधच्या पंतप्रतिनिधी संस्थानच्या काळात ताई तेलीन नावाची महिला किल्लेदार होती. तिची आणि पेशव्यांचे सरदार बापू गोखले यांच्यात या किल्ल्यावर लढाई झाल्याचे इतिहासात आढळते. दुर्गम असलेला हा किल्ला व्याघ्रगड म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रभरातील ट्रेकर्सना भुरळ घालणाऱ्या या किल्ल्याची सफर अविस्मरणीय असते. कोयनेच्या (Koyna Dam) शिवसागर जलाशयातील दीड तासांचा बोटीचा प्रवास, सभोवताली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे (Sahyadri Tiger Project) राखीव जंगल, पशुपक्ष्यांचा मुक्त संचार अशा रम्य वातावरणात वासोट्याच्या पायथ्याला पोहोचता येतं. बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लबच्या माध्यमातून बोट सेवा उपलब्ध केली जाते. पायथ्याला पोहोचल्यानंतर वन विभागाची परवानगी व आवश्यक शुल्क भरून ट्रेकला सुरुवात होते.

Vasota Fort

वासोट्याचे जंगल एवढे निबीड आहे, की इथं सूर्यकिरण ही जमिनीवर पोहोचत नाहीत. सूर्यकिरण मिळवण्यासाठी ताडमाड वाढलेले वृक्ष एकमेकांशी स्पर्धा करतात. मान उंच करून ही हे वृक्ष दिसत नाहीत. दीड तासांच्या चढाईनंतर किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येतं. किल्ल्यावर शंकराचे एक प्राचीन मंदिर, हनुमान मंदिर, जुन्या वाड्याच्या पायाचे भक्कम अवशेष व बुरुज आढळतात. किल्ले वासोटा किल्ल्याच्या पूर्वेला जुना वासोटा किल्ला आहे. जुना वासोटा किल्ल्याच्या डोंगरावरील एकावर एक असलेले कातळ खडकाचे, तर रचून झालेला बाबूकडा पाहताना मनाचा अक्षरश: थरकाप उडतो. या ठिकाणी दिलेल्या आवाजाचा प्रतिध्वनी पुन्हा-पुन्हा उमटतो. अशा या ऐतिहासिक वासोट्याचा ट्रेक चालू झाल्याने स्थानिकांसह व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या भागातील रोजगार व पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे.

Bamnoli

अतिवृष्टीमुळे वासोट्याच्या वाटा खूपच खराब झाल्या होत्या. या वाटा दुरुस्त केलेल्या आहेत. यावर्षी वासोट्याच्या शेजारील नागेश्वर हे ठिकाण वाट कोसळल्याने बंद ठेवणार आहोत. तेथील ओढ्याचा प्रवाहही बदलला आहे. तसेच शनिवार व रविवार या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता स्थानिक बोट क्लब ट्रेकर्स ग्रुप यांच्याशी बोलून मर्यादित लोकांना प्रवेश देण्याबाबत धोरण ठरविले जात आहे. प्लास्टिक कचरा प्रतिबंध, तसेच कोरोनाचे नियम पाळून शनिवारपासून वासोटा ट्रेक चालू करत आहोत.

-बी. डी. हसबनीस, वनक्षेत्रपाल वन्यजीव विभाग बामणोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

Amit Shah: “तुमच्या चार पिढ्या आल्या तरी पुन्हा कलम 370 आणू शकणार नाहीत”; अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं

Latest Maharashtra News Updates : धुळे जिल्ह्यात सव्वा दोन एकरात गांजाची शेती; सुमारे ६ कोटींचं पीक उध्वस्त

KL Rahul - आथिया शेट्टी होणार आई-बाबा! सोशल मीडियावरून केली घोषणा

TET Exam : आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक हजेरी होणार

SCROLL FOR NEXT