Trip To Kalasubai  esakal
टूरिझम

Trip To Kalasubai : न्यू इयर साठी दोन दिवसांच्या ट्रिपच प्लॅनिंग करत आहात? मग भेट द्या महाराष्ट्राच्या एव्हरेस्टला

नवीन वर्ष यावेळेस परफेक्ट दिवसात आलं आहे तो म्हणजे शनिवार रविवार

सकाळ डिजिटल टीम

bessiTrip To Kalasubai : नवीन वर्ष यावेळेस परफेक्ट दिवसात आलं आहे तो म्हणजे शनिवार रविवार, त्यामुळे आता सगळेच दोन दिवसाच्या ट्रिपसाठी प्लॅन करत असतील. त्यात जर ते ठिकाण शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात असेल तर विचारायलाच नको. या सुट्टीच अवचित्त साधत आपल्या मित्रांबरोबर, पार्टनर सोबत किंवा फॅमिली सोबत फिरण्यासाठीच उत्तम ठिकाण म्हणजे महाराष्ट्राचं एव्हरेस्ट अर्थात कळसुबाई शिखर.

कळसूबाई हे अकोला तालुक्यातल, अहमदनगर जिल्ह्यातल महाराष्ट्राच सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची समुद्र सपाटीपासून जवळजवळ 1646 मीटर एवढी आहे. पायथ्यापासून हे 900 मीटर उंचीवर आहे. हे भंडादरा धरणापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. हे सर्वात उंच शिखर असल्यामुळे महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखल जात. कळसूबाई शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहेत.

इथे कसं पोहोचायच?

नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे.

कळसूबाई देवीची आख्यायिका

कळसूबाई देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसुबाई ही त्या गावातली सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होत. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे.कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले.आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.

कळसूबाई चढण्याची वाट

कळसूबाई चढण्यासाठी इथे अर्ध्या वाटेपर्यंत पायऱ्या आहेत पुढे मात्र आपल्याला दगडांवरून जावं लागतं. यातही कठीण टप्प्यांवर शिड्यांची सोय असल्यामुळे तेवढं कठीण वाटतं नाही. साधारण शिखर चढायला 3 ते 4 तास लागतात.

आजूबाजूची ठिकाणं

अनेक ट्रेकर्स सुचवतात की तुम्ही इथे 2 दिवसांच्या मुक्कामी या, रात्री पायथ्याशी मुक्काम करा आणि 3-4 वाजेच्या वेळेत शिखर चढायला सुरुवात करा. याने तुम्हाला तिथे उगवता सूर्य बघता येईल, शिवाय हे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर असल्यामुळे इथे तुम्ही ढगांवर उभ असल्यासारखं वाटेल. इथे मुक्काम करून तुम्ही कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे बघू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT