What should be taken care of while traveling solo in monsoons  
टूरिझम

Solo Travel Tips: पावसाळ्यात सोलो ट्रिप करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

तुम्हीही पावसाळ्यात सोलो ट्रिपचा विचार करत असाल तर या ट्रिप आणि ट्रिक्स फॉलो करायला विसरू नका.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही काळापासून सोलो ट्रॅव्हलचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आपल्या आवडत्या ठिकाणी एकट्याने प्रवास करणे, नवीन लोकांना भेटणे, नवीन ठिकाणे एक्सप्लोर करणे आणि नवीन अनुभव घेणं हे अनेकांना आवडत असतं.

हिवाळा आणि उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यातही अनेकजण सोलो ट्रिपचा आनंद लुटत असतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीही पावसाळ्यात सोलो ट्रिपचा विचार करत असाल तर या ट्रिप आणि ट्रिक्स फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्ही पावसाळ्यात सोलो ट्रिपचा प्लॅन करत असाल, तर सर्वप्रथम तुम्ही प्रवासासाठी काय पॅक करत आहात आणि काय नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात सोलो ट्रिपला जाण्यापूर्वी तुम्ही तुमचे सर्व सामान वॉटरप्रूफ बॅगमध्ये पॅक करावे.

पावसाळ्यात सहलीला निघण्यापूर्वी रेन कोट, वॉटरप्रूफ शूज, कॅम्पिंग टेंट, हंगामी कपडे आणि आवश्यक औषधे पॅक करायला विसरू नका. याशिवाय तुम्ही वॉटरप्रूफ मोबाईल कव्हर आणि काही फास्ट फूड देखील पॅक करू शकता.

योग्य ठिकाणाची निवड करा

जर तुम्ही पावसाळ्यात सोलो ट्रिपला जात असाल तर सर्वप्रथम तुम्ही योग्य ठिकाण निवडले पाहिजे. पावसाळ्यात तुम्ही चुकीच्या ठिकाणी गेलात तर तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

जर तुम्ही पर्वतांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा हिल स्टेशनची निवड करावी जिथे जास्त धोका नाही. पावसाळ्यात तुम्ही पर्वतांऐवजी वाळवंटात किंवा जयपूर, उदयपूर, भोपाळ, दिल्ली किंवा चेन्नईसारख्या ऐतिहासिक ठिकाणांचीदेखील निवड करु शकता.

ट्रिपला जाताना कोणाला सांगू नका

सोलो ट्रिपचा आनंद लुटायाच असेल आणि सुरक्षित प्रवास करायचा असे तर तुम्ही एकटे जात आहात हे कोणालाही सांगू नका. तुम्ही सोलो ट्रिपला जात असाल आणि कुणाला सांगाल तर काही लोक त्याचा फायदा घेऊ शकतात.

सोलो ट्रिप दरम्यान, तुम्ही फक्त त्या ठिकाणांना भेट द्यावी जिथे गर्दी असते. जर तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी पोहोचलात आणि तुम्ही एकटेच बाहेर गेल्याचे कोणाला कळले तर अडचणी वाढू शकतात.

इमर्जन्सी नंबर नेहमी सोबत ठेवा

सोलो ट्रिपला जाण्यापूर्वी, इमर्जन्सी नंबर स्वतःजवळ ठेवावा. विशेषत: जर तुम्ही पावसाळ्यात डोंगरावर जाणार असाल तर चुकूनही या टिप्सकडे दुर्लक्ष करू नका.

आपत्कालीन क्रमांक म्हणून, तुमच्याकडे केवळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांचाच नंबर नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाचा नंबर देखील तुमच्याकडं असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्ही तुमच्या सहलीचे सध्याचे लोकेशन तुमच्या कुटुंबासोबत शेअर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT