Trekking tips Esakal
टूरिझम

ट्रेकिंगला जाताय? मग 'या' काही खास टिप्स नक्की वाचा

कारण ट्रेकिंग केवळ फिरायला जाणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

सकाळ डिजिटल टीम

Trekking tips: पावसाळा सुरू झाला की धबधब्याचं ठिकाण, नदी, एखादा किल्ला किंवा निसर्गरम्य ठिकाणी जायचे बेत नक्की होतात. अशा ठिकाणी अनेकदा अतिउत्साहाच्या भरात एखादी दुर्घटना घडते. निसर्गाच्या सहवासात जाताना त्याच्या नियमांप्रमाणेच वागायचं हे लक्षात घ्यायला हवं.

कारण ट्रेकिंग केवळ फिरायला जाणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा प्रवास आणखी चांगला होऊ शकतो.

● पहिल्यांदाच ट्रेकला जात असाल तर आठवडाभर दररोज किमान 30 मिनिटं बॉडी स्ट्रेचिंग आणि पायांचे इतर व्यायाम करा. तसंच चालण्यासाठीही दिवसातली किमान 30 मिनिटं राखून ठेवा.

● ट्रेकदरम्यान सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पायांची काळजी घेणं. त्यामुळे उत्तम पकड मिळेल असे ट्रेकिंगचे अथवा स्पोर्टस शूजच पायात घाला.

● ट्रेक दरम्यान जे शूज तुम्ही घालणार आहात, त्यांची पायांना सवय असणं गरजेचं आहे. त्यामुळे एका आठवड्यापूर्वी ते शूज वापरून पाहा.

● ट्रेकला जाण्यापूर्वी पायांची नखं व्यवस्थित कापा. वाढलेली नखं आणि बूट यांचं घर्षण झाल्यामुळे बोटांना खूप वेदना होऊ शकतात.

● ट्रेकला जाताना पायात शूज असले तरी चप्पल किंवा फ्लोटर्स सोबत घ्यायला विसरु नका. विसाव्याच्या ठिकाणी शूज आणि सॉक्स काढून पायांना मोकळं करा.

● लंच/ रेस्टिंग पॉइंटला अनवाणी फिरू नका.

● ट्रेकला जाताना संपूर्ण वाट माहीत नसल्यास स्थानिक वाटाड्याला सोबत घेणं केव्हाही चांगलं. स्वतःहून वाट शोधण्याचं दुःसाहस करू नका.

● वाटेत असलेल्या दिशादर्शक खुणांचा आधार घ्या.

● धोक्याच्या ठिकाणांबद्दल स्थानिकांनी दिलेले सल्ले गांभीर्याने ऐका. गावकरी/ वाटाड्यासोबत कधीही भांडू नका.

● चढताना एकमेकांशी बोलू नका जेणेकरून शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होणार नाही. दम लागत असल्यास, दर 10 पावलांनंतर थांबून खोलवर श्वास घ्या. मात्र तोंडानं श्वास घ्यायचं टाळा.

● चढताना तहान लागल्यास घटाघट पाणी पिण्यापेक्षा फक्त घसा ओला करा. नाही तर पोटात दुखण्याची शक्यता असते.समोर सोपी वाट दिसत असताना केवळ थ्रिल म्हणून कठीण वाटेनं जाणं शक्यतो टाळा.

● एखाद्या कड्यावर पोहोचलं की दरीत वाकून पाहण्याची सवय अनेकांना असते. मात्र डोंगराची उंची, धुकं, निसरडी जमीन आणि हवेचा जोर यांचा अंदाज नसल्यामुळे अपघात होऊ शकतात.

● उतारावर पाऊल तिरकं टाका. ज्यामुळे शरीराचं संतुलन राखणं सोपं होतं. शरीराचा पूर्ण भार एका पायावर देण्याआधी पायाखालची माती/ दगड घसरणार नाही याची काळजी घ्या.

● उतरताना आपल्या गुडघ्यांवर सहापट अधिक जोर येतो. म्हणून एखाद्या काठीचा आधार घेऊन उतरा.

● खाली उतरताना टाचेकडचा भाग आधी मातीत रोवावा. त्यामुळे पायांना चांगली पकड मिळते. उतरताना ओल्या दगडांवरुन अजिबात चालू नका.

● ट्रेक झाल्यावर पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात पाय ठेवल्यास पायांना बराच आराम मिळतो.

● डोंगरावर असताना काळे ढग आले तर जास्तीत जास्त वेळ पाण्यात राहू नका. कारण डोंगरातील वरच्या भागात पाऊस पडला तर खालील भागात कुंडात किंवा नदीत पाण्याची पातळी आणि प्रवाह पटकन वाढू शकतो.

● सर्वात महत्त्वाचं निसर्गरम्य स्थळी कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. दारू पिणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. असे अनेक अपघात झाल्याचं आपण बातम्यांमध्ये पाहतोच.

● मुळात निसर्गरम्य वातावरणात दारू पिणं हे चुकीचं आहे. अनेकदा पर्यटक अशा ठिकाणी मद्यपान करून काचेच्या बाटल्या तिकडेच फेकून जातात. या काचांमुळे पर्यटकांना, गावकऱ्यांना आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना इजा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT