Women's Day 2024 esakal
टूरिझम

Women's Day 2024 : मैत्रिणींनो यंदाच्या महिला दिनाला भारतातील ‘या’ ठिकाणांना करा एक्सप्लोअर, ते ही फ्रीमध्ये

Women's Day 2024 : जगभरात दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Women's Day 2024 : जगभरात दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १९७५ मध्ये सर्वात पहिला आणि अधिकृत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला होता, तेव्हापासून हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे.

या महिला दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या महिला दिनानिमित्त अनेक महिला एकत्र येऊन काहीतरी स्पेशल प्लॅन्स बनवतात. काही जणी सोलो ट्रॅव्हलिंगला जातात, तर काही जणी एकत्रित येऊन चित्रपट पहायला जातात.

यंदाच्या महिला दिनी तुम्ही जर कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण, खास महिला दिनानिमित्त भारतातील काही ठिकाणी महिलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. कोणती आहेत भारतातील ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात. (Women's Day 2024)

लाल किल्ला

आपल्या देशातील प्रमुख आकर्षण म्हणजे दिल्लीतील हा लाल किल्ला होय. जर महिला दिनी तुम्हाला दिल्लीतील हा सुप्रसिद्ध लाल किल्ला पहायचा असेल तर, या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.

या लाल किल्ल्यावर सोमवार ते शुक्रवार प्रति व्यक्ती साधारणपणे ६० रूपये प्रवेशशुल्क आहे. या व्यतिरिक्त शनिवारी आणि रविवारी ८० रूपये प्रवेशशुल्क पर्यटकांकडून आकारले जाते. परंतु, महिला दिनानिमित्त या ठिकाणी येणाऱ्या महिलांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेशशुल्क आकारले जात नाही. त्यामुळे, महिला दिनानिमित्त महिलांना हे ठिकाण फुकट पाहता येणार आहे. (Red Fort)

ताजमहाल

‘प्रेमाचे प्रतिक’ म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल हा जगभरात प्रसिद्ध आहे. देशातीलच नव्हे तर परदेशातील असंख्य पर्यटक या ठिकाणी दरवर्षी भेट देत असतात. जर तुम्हाला ही हा ताजमहाल पहायचा असेल तर महिला दिनी तुम्ही हा ताजमहाल फुकटात पाहू शकणार आहात. कारण, महिला दिनी या ठिकाणी प्रवेश करू इच्छिणाऱ्या महिलांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

साधारणपणे या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ५० रूपये प्रवेश शुल्क आकारले जाते. तसेच, जर तुम्हाला ताजमहालातील मुख्य मकबरा आतून आणि वरच्या दिशेने पहायचा असेल तर त्यासाठी २०० रूपये शुल्क आकारले जाते. मात्र, महिला दिनी महिलांना कोणतेच शुल्क भरावे लागणार नाही. त्यामुळे, हे ठिकाण महिला फ्रीमध्ये पाहू शकणार आहेत. (Taj mahal)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT