Old Bike esakal
Trending News

OMG! सायकलसारखी दिसणारी 115 वर्ष जुनी बाईक, तब्बल 7.73 कोटींना विकली गेली; कारण...

हार्ले डेव्हिडसनच्या बाईक जगभरात प्रसिद्ध आहेत आपल्या दमदार इंजिन आणि कडक लूकसाठी

सकाळ ऑनलाईन टीम

1908 Harley Davidson Strap Tank: हार्ले डेव्हिडसन असं नुसतं नाव जरी कानावर पडलं तरी समस्त पुरुष वर्गाच्या डोळ्यासमोर एक सुंदर आणि दमदार बाईकचं चित्र उभं राहतं. प्रत्येक मुलाला किंबहुना पुरुषांना ही बाईक हवी असते, ती विकत घेणं किंवा त्यावर राईड करणं त्यांचं स्वप्न असतं. आणि पुरुषच नाही बरं का, स्त्रियांमध्ये सुद्धा या बाईकची क्रेझ आहे. हार्ले डेव्हिडसनच्या बाईक जगभरात प्रसिद्ध आहेत आपल्या दमदार इंजिन आणि कडक लूकसाठी.

मात्र ही बाईक खरेदी करणं, हे सर्वांना परवडण्यासारखं नाही. आज जशी ही बाईक प्रसिद्ध आहे, तशीच ही 100 वर्षांपूर्वी देखील जगभरात प्रसिद्ध होती. नुकताच हार्ले डेव्हिडसनच्या एका व्हिंटेज बाईकचा लिलाव झाला आहे. ही बाईक 1908 मध्ये हार्ले डेव्हिडसनने बनवली होती, जिचा आता लिलाव करण्यात आला आहे.

या ही 115 वर्ष जुनी बाईक तब्बल 935,000 डॉलर्समध्ये विकली गेली आहे. भारतीय चलनात ही रकम जवळपास 7.73 कोटी रुपये इतकी होते. यासोबतच लिलावात विकली गेलेली ही जगभरातील सर्वात महागडी बाईक ठरली आहे. विशेष म्हणजे ही बाईक दिसायला सायकलसारखी आहे.

1908 मध्ये बनवलेल्या 450 हार्ले डेव्हिडसन बाईक्सपैकी ही बाईक एक आहे. सध्या जगात या 450 बाईक्सपैकी 10 ते 12 बाईक्स उरल्या आहेत. रिपोर्टनुसार ही बाईक 1941 मध्ये डेव्हिड उहलेन नावाच्या व्यक्तीकडे होती. पुढचे 66 वर्षे त्यांनी तिला आपल्याजवळच ठेवलं. या बाईकच्या मॉडेलचं नाव 'स्ट्रॅप टँक' Harley-Davidson Strap Tank होतं. कारण याच्या इंधनाच्या टाक्या निकेल-प्लेटेड स्टीलच्या पट्ट्यांसह जोडलेल्या होत्या. (Automobile)

28 जानेवारी रोजी लास वेगासमधील या बाईकचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मेकम ऑक्शन्सने या स्ट्रॅप टँक बाईकचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. या फोटोवर 8,000 पेक्षा जास्त लाईक्स आणि 800 च्या जवळपास कमेंट्स आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT