Maleesha Kharva Sakal
Trending News

Trending News : झोपडपट्टीतली मलेशा बनली फॅशन आयकॉन; १५ वर्षांच्या युवतीची चर्चाच चर्चा

सिनेमांमुळे काही काळ झोपडपट्टीतली मुलं लाईमलाईटमध्ये येतात, पण पुन्हा अंधार होतो.

वैष्णवी कारंजकर

झोपडपट्टीतली मुलं चर्चेत केव्हा येतात, जेव्हा त्यांना एखादा व्हिडीओ व्हायरल होतो, किंवा त्यांच्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित होतो. पण अलिकडेच बांद्रा बँडस्टँडच्या झोपडपट्टीत राहणारी एक सामान्य मुलगी एक मोठ्या लक्झरी कॉस्मेटिक ब्रँडचा चेहरा बनली आहे. तिने आपल्या या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

आपल्या प्रवासाबद्दल १५ वर्षीय मलेशा खारवा सांगते की, कोणाला काय वाटतं, याची मला पर्वा नाही. माझा द्वेष करणाऱ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. मला ९० टक्के खात्री आहे की तुम्ही माझा तिरस्कार करता. पण मला त्याची पर्वा नाही, याची १०० टक्के खात्री आहे. एका फॅशन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीबद्दल तिने इन्स्टाग्राम पोस्टशेअर केली आहे.

पूर्वी 'सलाम बॉम्बे!' आणि 'स्लमडॉग मिलेनियर' सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्यानंतर झोपडपट्ट्यांमधील मुलांनी काही काळ अनुभवला आहे, परंतु सोशल मीडियाने प्रत्येकासाठी समान व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. शालेय गणवेशातल्या एका किशोरवयीन मुलीचा, कॉस्मेटिक ब्रँडच्या आलिशान शोरुमबाहेरचा स्वतःचा फोटो बघत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडिायवर फिरत आहे.

शनिवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले की, मलेशासोबत त्यांनी संपर्क साधला होता. “तिला काही मदत हवी असेल तर सरकार तिला पाठिंबा देण्यास मागेपुढे पाहणार नाही,” कंकल म्हणाले.

सांताक्रूझ पश्चिम येथील बीएमसी संचालित एमपीएस गजधर पार्क माध्यमिक विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी मलेशा, मॉडेल बनण्याचे स्वप्न पाहते आणि प्रियांका चोप्राकडे प्रेरणा म्हणून पाहते.

तिचा चुलत भाऊ अमेरिकी कलाकार रॉबर्ट हॉफमन याच्या एका म्युझिक व्हिडीओसाठी २०२० मध्ये कलाकार शोधत होता. मलिशा उंच असल्यामुळे तिची निवड होऊ शकली नाही. पण त्याने तिला मॉडेलिंग करण्याचं सुचवलं आणि तिच्यासाठी एक इन्स्टाग्राम पेजही तयार केलं. दोन वर्षानंतर तिचे २,२५,००० फॉलोअर्स झाले आणि तिला अनेक फॅशन मॅगझिन्सच्या पहिल्या पानावर स्थान देण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT