1600 iPhones worth around Rs 12 crore have been stolen from a truck in Madhya Pradesh's Sagar district Esakal
Trending News

Viral Video: 12 कोटींहून अधिक किमतीचे iPhone कसे लुटले? पाहा 1600 Apple Mobile च्या चोरीचा थरार

आशुतोष मसगौंडे

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका ट्रकमधून सुमारे 12 कोटी रुपये किमतीचे 1600 आयफोन चोरीला गेले आहेत. प्राथमिक तपासात या चोरीमध्ये ट्रकसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रक हरियाणाहून चेन्नईला जात असताना हा प्रकार घडला.

सागर झोनचे पोलिस महानिरीक्षक प्रमोद वर्मा यांनी एएनआयला सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली की 12 कोटी रुपयांचे 1600 आयफोन लुटले गेले आहेत. सुरक्षा रक्षकाला आरोपी म्हणून सांगण्यात येत आहे.

पथके तयार करण्यात आली असून आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. पोलिसांनी सांगितले की, कंटेनर हरियाणातील गुरुग्राम येथून चेन्नईला जात होता.

चालकाच्या म्हणण्यानुसार, चोरीची ही कथित घटना 15 ऑगस्ट रोजी घडली, जेव्हा कंटेनर हरियाणातील गुरुग्रामहून चेन्नईला जात होता. ड्रायव्हरने असा आरोप केला आहे की, चोरी करताना त्याला ड्रग्ज आणि गळफास लावण्यात आला होता.

सागरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणाले, 'आम्ही चालकाच्या दाव्याची पडताळणी करत आहोत की 12 कोटी रुपये किमतीचे सुमारे 1,600 आयफोन चोरीला गेले आहेत. या फोन्सची निर्माता कंपनी ॲपलने अद्याप पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. मी सध्या घटनास्थळी असून ट्रकची व्हिडिओग्राफी सुरू आहे.

या दरोड्यानंतर चालकाने तक्रार नोंदवण्यासाठी बंदरी पोलिस ठाण्यात फेऱ्या मारल्या, मात्र 15 दिवस उलटूनही तक्रार घेतली गेली नाही. आता हे संपूर्ण प्रकरण आयजी प्रमोद कुमार वर्मा यांच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी स्वतः बंदरी पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.

चोरीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून दोघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT