Viral Video PCMC  Esakal
Trending News

Viral Video: भाजी विक्रेती ओरडतच राहिली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

PCMC: हे अतिक्रमण हटाव पथक करताना अशाप्रकारे छोट्या विक्रेत्यांना मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे विक्रेते त्याचबरोबर नागरिकही संतापले आहेत.

आशुतोष मसगौंडे

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील दापोडीमध्ये अतिक्रमण कारवाई करत असताना पथकातील महिला सुरक्षारक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

यावेळी सुरक्षा रक्षकांनी या भाजी विकणाऱ्या महिलेला मारहाण करत जमिनिवर ढकलून दिले. यावेळी ती महिला आरडा ओरड करत राहिती तरीह महिला सुरक्षा रक्षकांनी मारहाण थांबवली नाही.

पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेने हॉकर्स धोरण सध्या कार्यरत नाही. त्यामुळे अनेक छोटे विक्रेत भाजीपाला आणि इतर वस्तू विकत असतात. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे. याचबरोबर वाहतूक कोडींही निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी एक भरारी पथक नेमले आहे. त्यामध्ये एमएसएफच्या जवणांचा समावेश करण्यात आला आहे.

हे अतिक्रमण हटाव पथक करताना अशाप्रकारे छोट्या विक्रेत्यांना मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे विक्रेते त्याचबरोबर नागरिकही संतापले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT