काही वेळातच हा वाद चिघळला आणि कार्यकर्ते चक्क हाणामारीवर उतरले.
Delhi Municipal Election : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) आमदार गुलाब सिंह यादव यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं समोर आलंय. भाजपनं (BJP) या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केलाय.
या व्हिडिओमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी गुलाब सिंह यादव (Gulab Singh Yadav) यांना कानाखाली मारल्याचं, तसंच त्यांचा पाठलाग करून त्यांना चोपल्याचं दिसतंय. याशिवाय, संतप्त कार्यकर्त्यांपासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी त्यांना पोलीस स्थानकात जावं लागल्याचं दिसतंय. भाजपनं व्हिडिओ शेअर करत गुलाब सिंह यादव यांनी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची (Delhi Municipal Election) तिकिटं विकल्यामुळं त्यांना आपच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं म्हटलंय.
आपच्या भ्रष्टाचारी आमदारांसोबत असंच होणार असल्याचा इशाराही भाजपनं केजरीवालांना या पोस्टमधून दिलाय. भाजपच्या दिल्लीतील बहुतेक नेत्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत केजरीवाल आणि आपची खिल्ली उडवलीय. गुलाब सिंह हे दिल्लीतील मटियाल मतदारसंघाचे (Delhi Matiala Constituency) आमदार आहेत. दिल्लीत 1 डिसेंबर व 4 डिसेंबर रोजी महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत.
त्यासंदर्भात आपची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून दोन गटात बाचाबाची झाली. यानंतर संतप्त कार्यकर्ते सिंह यांच्याशी वाद घालू लागले. काही वेळातच हा वाद चिघळला आणि कार्यकर्ते चक्क हाणामारीवर उतरले. कार्यकर्त्यांनी गुलाब सिंह यांना धक्काबुक्की करत कार्यालयाबाहेर काढलं आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्याच पक्षातील काही वरिष्ठांनी मध्यस्थी करत ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तेथून गुलाब सिंह यादव यांना कार्यकर्त्यांच्या तावडीतून सोडवून बाहेर नेलं. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदाराविरुध्द जोरदार घोषणाबाजी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.