Anant Ambani watch impresses Mark Zuckerberg Viral Video esakal
Trending News

Viral Video : अनंत अंबानींचे कोट्यवधींची घड्याळ पाहून झुकरबर्गही शॉक्ड! 'इतकी' आहे किंमत

Anant Ambani watch impresses Mark Zuckerberg Viral Video : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरू आहे.

रोहित कणसे

Anant Ambani watch impresses Mark Zuckerberg Viral Video : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी प्री-वेडिंग समारंभ होत आहेत. यादरम्यान अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सेरेमनीबद्दल चर्चा होतेय. आता याच सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनंत अंबानींनी घातलेले घड्याळ या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. अनंत अंबानींचे घड्याळ हे सामान्य नाहीये. हे घडाळ्या पाहून फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गही शॉक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरेतर नेट वर्थच्या बाबतीत झुकेरबर्ग हा मुकेश अंबानींच्याही पुढे आहे आणि सध्या जगातील 5 श्रीमंतांमध्ये त्यांची गणना केली जाते.

अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मार्क झुकेरबर्ग पत्नी प्रिसिला चॅन सोबत भारतात आला आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, फेसबुकचा संस्थापक झुकरबर्गची सध्याची एकूण संपत्ती $176.1 अब्ज आहे. या अफाट संपत्तीमुळे ते जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे. तर भारतासह संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची सध्याची संपत्ती 117 अब्ज डॉलर्स आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 9व्या क्रमांकावर आहेत.

या घड्याळाची किंमत किती?

व्हायरल व्हिडिओमध्ये मार्क झुकरबर्ग आणि अनंत अंबानी बोलत असल्याचे दिसत आहे. मार्क झुकरबर्गची पत्नी प्रिसिला चॅन झुकरबर्ग आणि इतर अनेक लोक तिथे उभे आहेत. मग झुकेरबर्गची नजर अनंतच्या घड्याळाकडे जाते. आता प्रत्येक जण त्या घडाळाबद्दल चर्चा करत आहे. अनंत अंबानींनी घातलेले घड्याळ रिचर्ड मिलचे असून त्याची किंमत 14 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा देश-विदेशात चर्चेत आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आणि भारतीय व्यावसायिक जगतापासून ते सिलिकॉन व्हॅलीपर्यंत अनेक दिग्गजांनी या सोहळ्यात सहभाग घेतला आहे. मार्क झुकरबर्ग व्यतिरिक्त बिल गेट्स, गायिका रिहाना, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT