Anant Radhika not hosting any post wedding bash at England Stoke Park confirms hotel authority 
Trending News

Anant Radhika Post Wedding : अनंत राधिकाच्या लग्नानंतर आता पोस्ट वेडिंग पार्टीचा जल्लोष..! ब्रिटनमधील हॉटेल मालकानं दिलं स्पष्टीकरण...

सकाळ डिजिटल टीम

गेल्या आठवड्यात म्हणजेच, 12 जुलैला अनंत राधिकाच लग्न पार पडलं पण अद्याप त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरुच आहे. अशातच, अंबानी कुटुंब अनंत राधिकाच्या लग्नाची पार्टी ब्रिटनमध्ये देणार असल्याची चर्चा रंगली आहे. आणि यासाठी ब्रिटनमधील प्रसिद्ध हॉटेलदेखील बुक करण्यात असल्याचे सांगण्यात आलं. त्यामुळं या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला नवं वळण मिळालं.

अनंच राधिकाच्या लग्नानंतर रिसेप्शन पार्टी तीन दिवस मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. आता लग्नाचे विधी संपले असून, ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन'ने अहवालात दावा केला की, अंबानी कुटुंब लंडनमध्ये लग्नाची पार्टी देणार आहे.

तेथील 7-स्टार हॉटेल स्टोक पार्क दोन महिन्यांसाठी बुक करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. पण आता हॉटेलनेच हे दावे फेटाळून लावले आहेत. (Anant Radhika not hosting any post wedding bash at England Stoke Park confirms hotel authority)

स्टोक पार्कने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये अनंत राधिकाच्या लग्नाच्या पार्टीसंदर्भात खुलासा केला आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

स्टोक पार्ककडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये अंबानी कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पण यामध्ये, याठिकाणी कोणताही लग्नसोहळा आयोजित केला जात नसल्याचे म्हटले आहे.

तसेच, 2021 मध्येच, लंडनची हाय प्रोफाईल स्टोक पार्क इस्टेट मुकेश अंबानींच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने 57 दशलक्ष पौंडला लीजवर घेतली होती. तेव्हापासून येथे नूतनीकरणाचे काम सुरू होते.

हॉटेल स्टोक पार्कने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'स्टोक पार्कमध्ये आम्ही सहसा खाजगी बाबींवर भाष्य करत नाही.

परंतु अलीकडच्या माध्यमांच्या अंदाजानुसार आणि अचूक माहितीच्या हितासाठी, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की या उन्हाळ्यात आमच्या इस्टेटमध्ये कोणताही विवाह सोहळा आयोजित केला जात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT