रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चट आज लग्नबंधनात अडकणार आहे. या शाही लग्नसोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या लग्नाला देश-विदेशातील अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या या शाही लग्नाची तयारी पाहता देशभर सध्या चर्चा रंगली ती म्हणजे खर्चाची.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबातील हे लग्न सर्वात महागडे लग्न ठरणार आहे. लग्नाचा खर्च ढोबळमानाने काढला आहे. जर आपण रिहाना, जस्टिन बीबरचा परफॉर्मन्स, लग्नाच्या निमंत्रणाचा खर्च सुमारे 7000 डॉलर्स, सुरक्षा, खाजगी जेट, लक्झरी सूट इत्यादींचा समावेश केला तर अनंत-राधिकाच्या लग्नाचा एकूण खर्च सुमारे 320 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 26,72,14,40,000 रुपयांपर्यत असू शकतो.
हा खर्च पाहून अंबानी कुटुंब जगभरातले रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचे म्हटले आहे. पण तुम्हाला सर्वांना माहितीय का, 20 वर्षापूर्वीही असे शाही लग्न भारतीयांनी पाहिलं आहे.
गिनीज बुकनुसार जगातील सर्वात महागडे लग्न एका भारतीयाने केले आहे. जगातील सर्वात महागड्या लग्नाचा विक्रम स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल यांची मुलगी वनिषा मित्तल हिच्या नावावर आहे.
वनिषा मित्तलने 2004 मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर अमित भाटियाशी लग्न केले होते. हा विवाह भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाला होता.
गिनीज बुकनुसार, लक्ष्मी निवास मित्तल यांच्या मुलीच्या लग्नाचा कार्यक्रम व्हर्सायमध्ये 6 दिवस चालला. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे हा विवाहसोहळा पॅलेस ऑफ व्हर्सायमध्ये आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, आजपर्यंत या पॅलेसमध्ये आयोजित केलेला हा एकमेव खाजगी कार्यक्रम असल्याचे सांगितले जाते.
या लग्नात अनेक परदेशी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी परफॉर्म केले. अहवालानुसार, या लग्नात 55 दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले आणि आजच्या दरानुसार ते भारतीय चलनात रूपांतरित केले तर ते सुमारे 450 कोटी रुपये आहे.
अनेक अहवालांमध्ये प्रिन्स चार्ल्स आणि डायनाच्या लग्नाला जगातील सर्वात महागडे लग्न म्हटले जाते. या लग्नात 110 दशलक्ष डॉलर्स खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय, काही रिपोर्ट्समध्ये, रशियाच्या सैद गुत्सेरिव्ह आणि खादिजा उझाखोव्ह यांच्या लग्नाला जगातील सर्वात महागडे लग्न म्हणून टॅग दिला जात आहे. परंतु, या लग्नावर झालेल्या एकूण खर्चाची अधिकृत माहिती नसल्याने जगातील सर्वात महागडे लग्न कोणते हे स्पष्टपणे सांगता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.