Asaram Bapu esakal
Trending News

Asaram Bapu : 'टांगेवाला कसा बनला आसाराम बापू?' जाणून घ्या कसं उभारलं साम्राज्य

मात्र एक साधारण टांगेवाल्याला आसाराम बापू ही ओळख कशी मिळाली याबाबत तुम्हाला माहितीये काय?

साक्षी राऊत

Asaram Bapu Life Journey : आसाराम बापू परत एकदा चर्चेचा विषय ठरताय. अगदी काही दिवसांपूर्वी आसाराम बापूंना एका बलात्कार केस प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याआधीही अनेक अल्पवयीन मुलींच्या बलात्काराप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र मागल्या दोन दिवसापासून ट्विटरवर एक भलताच ट्रेंड बघायला मिळतोय.

'#अब तो छोड दो' या ट्विटर हॅशटॅगखाली तुम्हाला त्याच्या सुटकेची मागणी करणाऱ्या वेगवेगळ्या पोस्ट बघायला मिळतील. मात्र एक साधारण टांगेवाल्याला आसाराम बापू ही ओळख कशी मिळाली याबाबत तुम्हाला माहितीये काय? ती कहाणीही निराळीच आहे. आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

आसाराम बापूचं संपूर्ण नाव आहे आसुमल थाउमल हरपलानी. 2013 मध्ये एका रेप केसमध्ये अडकल्यानंतर आसाराम यांचे वाईट दिवस सुरु झाले. या केसनंतर एवढं मोठं साम्राज्य उभारणाऱ्या आसारामला रस्त्यावर नव्हे तर जेलमध्ये आणून उभं केलं. मात्र एकेकाळी या व्यक्तीने सायकल रिपेयरींगचं काम केलंय.

सायकल रिपेअरींग ते टांगा चालक

पाकिस्तानच्या सिंध प्रातातील एक शरणार्थी मुलगा फाळणीनंतर गुजरातच्या अहमदाबादेत पोहोचला. सुरुवातीला त्याने सायकल रिपेअरींग ते टांगा चालवण्यापर्यंत सगळी कामं केलीत. आणि बघता बघता तो असुमल ते आसाराम बनला. या व्यक्तीची बायोग्राफी बघता तुम्हाला त्याचं शिक्षण केवळ तिसऱ्या वर्गापर्यंत झालं असल्याचं दिसेल.

आसाराम यांच्या एका मित्राच्या सांगण्याप्रमाणे, आसारामने किशोरवयातच कच्छचे एक सिंधी संत लीली शाह बाबांचा भक्त बनण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सत्य सार्वजनिकरित्या कधी उघड झालं नाही. लगेच आसुमल नावाच्या या पोराने त्याचं नाव बदलून आसाराम बापू ठेवत संन्यासीचे पांढरे वस्त्र परिधान केले. त्यानंतर लोक त्याच्याजवळ जमायला लागले. सत्तरीच्या दशकात आसारामने अहमदाबाद शहरात जवळपास १० किलोमीटर दूर एका कस्ब्यात त्याचं पहिलं आश्रम सुरु केलं. अशा प्रकारे हळू हळू त्याचं साम्राज्य वाढत गेलं

2300 कोटी संपत्तीचा दावा

जून 2016 मध्ये आयकर विभागाने आसारामची 2300 कोटींची अघोषित संपत्ती जगापुढे आणली. तेव्हा मिडिया रिपोर्ट्सनुसार आसारामचे जगभरात 400 आश्रम जगभरात असल्याचे कळले. यातील काही आश्रम आसारामच्या भक्तांनी मालकांकडून बळजबरीने हडप केले होते तर काही आश्रमांच्या जमिनीचा अजूनही वाद सुरु आहे.

या आश्रमांतून कमाई कशी व्हायची

आध्यात्मिकता आणि जनसेवेवर आधारीत आश्रमातील काही पत्रिका दरवर्षी त्यांना कोट्यावधी रुपयांचा फायदा देत होत्या. तसेच जवळपास दोन डजन प्रकारच्या उत्पादनांच्या विक्रीतूनही कोट्यावधी रुपये मिळायचे. ज्यात अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी, गोमूत्र, साबण, शाम्पू आणि अगरबत्ती यांचा समावेश होता. आसारामच्या या साम्राज्यावर नियंत्रण ठेवणारे जवळजवळ 400 ट्रस्ट होते. एवढेच नव्हे तर दरवर्षी गुरू पोर्णिमेच्या दिवशी गुरुदक्षिणा कार्यक्रमाच्या माध्यमातूनही भरपूर पैसे जमा केले जायचे. या दिवशी लाखो लोक यायचे आणि मोठी रक्कम दान म्हणून द्यायचे. आणखी बऱ्याच प्रकारे आसारामने लोकांकडून पैसे वसूल केले आहेत.

नरबळी प्रकरणापासून आसाराम वादाला सुरुवात झाली

1980 ते 2008 पर्यंतचे दिवस आसारामसाठी सोन्यासारखे दिवस होते. मात्र अहमदाबादमधील एका आश्रम शाळेतील दोन विद्यार्थांच्या हत्याप्रकरणानंतर (Crime) आसारानवर अनेक आरोप झालेत. आसाराम तांत्रिक आहे ज्याने त्याच्या अनुष्ठानासाठी दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला. हा आरोप सिद्धा झाला नसला नसला तरी त्याच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं झालं.

अशाप्रकारे खचलं आसारानचं साम्राज्य

आसारामचे वाईट दिवस सुरु झालेत 2013 पासून. दिल्ली पोलिसांना जेव्हा सांगण्यात आले की आसारामच्या जोधपूर आश्रमात एका अल्पवयीन मुलीचे शोषण करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हे प्रकरण जोधपुर पोलिसांकडे सोपवण्यात आलं. 2013 मध्ये आसारामची मेडिकल टेस्ट करण्यात आली. ज्यात हे सिद्ध झाले की आसाराम लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यात सक्षम होते. 2018 मध्ये आसारामवरील या प्रकरणाबाबतचा दोष सिद्ध झाला आणि त्यास आरोपी घोषित करण्यात आले. ज्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुणावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT