बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरू येथील खासगी वाहतूक संघटनांनी बंगळुरूमध्ये संप पुकारला असून काँग्रेस सरकारने राज्यात घेतलेल्या निर्णयाचा विरोध या संघटनेकडून करण्यात येत आहे. सरकारने राज्यात महिला आणि तृतीयपंथीयांसाठी लागू केलेली 'शक्ती योजना' परत घेण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारला आहे.
वाहतूक संघटनाने पुकारलेल्या संपामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला असून कामाचा खोळंबा झाला आहे. तर सर्व वाहन चालकांनी आपापले वाहने एका जागी उभे करून वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना मागे घ्यावी अशी मागणी या संघटनेने केली आहे.
काय आहे शक्ती योजना?
महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना राज्यात मोफत बस प्रवास देण्याचा उद्देश या योजनेचा आहे. या अंतर्गत एकाही महिलेला आणि ट्रान्सजेंडरला प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
या योजनेमुळे खासगी वाहतुकीला फटका बसणार असल्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक, कामगार, शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.