Bhangarwala iPhone Video Viral  Sakal
Trending News

iPhone Video Viral: विषय संपला! भंगारवाल्याकडे 85 हजारांचा आयफोन अन् गिफ्ट म्हणून लेकालाही दिला लाखाचा आयफोन; व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

iPhone 16 Pro Max Viral Video: सध्या अ‍ॅपल आयफोनची क्रेझ वाढली आहे. ॲपलकडून दरवर्षी नवीन आयफोन सीरीज लॉन्च केली जाते. यावेळी Apple iPhone 16 सीरीज लॉन्च करण्यात आली आहे, ज्याची विक्री 20 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. iPhone 16 खरेदीसाठी प्रचंड उत्साह दिसत आहे.

ॲपलच्या दिल्ली आणि मुंबईतील स्टोअर्सवर लांबच लांब रांगा लागलेल्या आपण पाहिल्या आहेत. दरवर्षी अ‍ॅपल आयफोन लॉन्च करते आणि दरवर्षी तितकीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नवीन आयफोन 16मध्ये अनेक फीचर्स आहेत आणि दरवर्षी नवीन आयफोन लोकांना घ्यायचाच असतो.

बरेच लोक Amazon आणि Flipkart च्या सेलची वाट पाहत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भंगारवाल्याकडे आयफोन आहे आणि तो सांगतोय की, मी माझ्या लेकालाही आयफोन गिफ्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

भंगारवाला व्हिडिओमध्ये सांगतोय की, मी बारा महिने बाटल्या, काच, भंगार गोळा करतो. माझ्याकडे 85 हजारांचा आयफोन आहे. मी माझ्या मुलाला सांगितलं की, तू दहावीला चांगले मार्क मिळवं. तुलाही आयफोन घेऊन देतो. मुलानेही जिद्दीने मार्के मिळवले आणि मी त्याला 1 लाख 8 हजारांचा आयफोन घेतला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. 'मेहनतीचा पैसा आहे बॉस राजकारणी अधिकारी यांच्या सारखा भ्रष्टाचाराचा नाही' असे एका नेटकऱ्याने लिहिले. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, 'कोणतंही काम करा शेवटी जिथे मेहनत असते तिथे सर्व भेटतं.....' तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, 'काम काम असतं , काम कोणतंही असो प्रामाणिक करा. यश मिळणार यात शंका नाहीच , याचं जिवंत उदाहरण'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voting Registration: विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं 'हे' महत्वाचं आवाहन

Swara Bhaskar चे पती विधानसभा निवडणूक लढवणार? मुंबईतील 'या' मतदारसंघातून उमेदवारी मिळणार

Assembly Election 2024: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना टीव्हीवर जाहिरात द्यावी लागणार; आयोगाने सांगितला कठोर नियम

Assembly Elections 2024: महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक कधी? तुफान पाऊस, सणासुदीचे दिवस, आयोगाचे आस्ते कदम...

Dharmaveer 2 : धर्मवीर 2 ने घडवला इतिहास ; ठरला सगळ्यात जास्त ओपनिंग करणारा मराठी सिनेमा

SCROLL FOR NEXT