Blinkit Order Viral Post Esakal
Trending News

Blinkit Order: पुरुषाच्या जागी आली महिलांची अंडरवेअर, नाराज ग्राहकाने परिधान करून शेअर केला फोटो... नेटवर हाहाकार

आशुतोष मसगौंडे

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका युजरची पोस्ट खूप व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहून लोक मजेशीर कमेंट करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत आहेत.

वास्तविक, युजरने ऑनलाइन डिलिव्हरी कंपनी ब्लिंकिटकडून अंडरवेअर ऑर्डर केली होती. परंतु कंपनीकडून थोडी चूक झाली आणि कंपनीने एकाच वेळी तीन महिला अंडरवेअर पाठवले.

या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रियांश नावाच्या अकाऊंटवरून त्याच्यासोबत घडलेली ही घटना सोशल मीडियावर शेअर केली. यासह ब्लिंकिट प्रश्न करत ही वस्तू आता कशी परत करायची असाही प्रश्न केला. कारण ब्लिंकिट कस्टमर केअरशी संपर्क करूनही युजरकडून ती वस्तू माघारी नेलेली नाही.

व्हायरल झालेली बातमी पाहताच लोकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. ही व्हायरल झालेली बातमी आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे.

युजर्सकडूनही अनेक मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले, “तुझ्या मैत्रिणीला गिफ्ट करा”… “भाऊ, तू काय घालणार आहेस”… “संधी जाऊ देऊ नकोस”… अशाप्रकारे, यूजर्स या पोस्टवर खूप मजेदार सल्ला देत आहेत.

काही तासांनंतर युजरने आणखी दोन फोटो शेअर केले. एका फोटोत ऑर्डरचे पॅकेट दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तीन पँटीजचा संच दिसत आहे. नंतर त्याने एक अपडेट पोस्ट करत सांगितले की, कंपनीने त्याचे पैसे परत करण्यास नकार दिला.

पुढे युजरने त्याने पँटी सेटचा आणखी एक फोटो शेअर केला, यामध्ये एक काळ्या रंगाची पँटी गायब असल्याचे दिसत आहे. युजर म्हणाला की, “अपडेट : ब्लिंकिटने माझे पैसे परत करण्यास नकार दिला म्हणून मी तडजोड केली.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: "जिंदगीभर असंच सुरु राहील का?", शेतकऱ्यानं तहसील कार्यालयाचं गेट बंद करुन बांधले बैल नंतर जे घडलं ते...

India vs Bangladesh Toss Update: बांगलादेशने टॉस जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय; भारताकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा

Train Accident: उत्तर भारतात रेल्वे मालगाडीला दोन ठिकाणी अपघात; दिल्लीकडे जाणाऱ्या 15 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Latest Marathi News Updates : स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री शिंदे झाले सहभागी, गिरगाव चौपाटीवर केली स्वच्छता

Archana Puran Singh : कपिल शर्मा शोमध्ये मला हसण्यासाठी पैसे मिळतात, मी त्यात खूश आहे अस का म्हणाली अर्चना पूरण सिंह

SCROLL FOR NEXT