Blue Tick Memes thousands of celebrities twitter accounts blue tick removed check memes going viral  
Trending News

Blue Tick Viral Memes : अब पैसा देना पडेगा…सेलिब्रिटींची ओळख असलेलं ब्लू टिक अचानक गायब, मीम्सचा नुसता पाऊस

रोहित कणसे

Blue Tick Viral Memes : ट्विटरने अखेर आज (२० एप्रील) पासून मुख्यमंत्री, खेळाडू , अभिनेते आणि राजकारणी यांच्या खात्यांचे ब्लू टिक्स काढण्यास सुरुवात केली आहे. जे जागतिक नेते, सेलिब्रिटी आणि खेळाडू यांच्या अधिकृत खात्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जात होते. आतापासून, ज्या वापरकर्त्यांनी सशुल्क ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेची सदस्यता घेतली आहे त्यांना मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ब्लू टिक्स दिसेल.

मात्र आज भारतातील अनेक बड्या व्यक्तींच्या ब्लू टिक्स ट्विटरवरून गायब झाल्या आहेत. यामध्ये विराट कोहली, सौरभ गांगुली, शाहरुख खान, अरविंद केजरीवाल, रवी किशन आणि अगदी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावांचा समावेश आहे.

यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. कित्येकांनी सेलिब्रेटींच्या अकाउंटला ब्लू टीक नाहीये आणि ट्रोलर्सना ब्लू टीक दिसत असल्याने ट्वीटरची खिल्ली उडवली जात आहे.

मीम्सच्या माध्यमातून नेटकरी लेगसी ब्लू टिक होल्डर्स अकाउंटची टर उडवताना दिसत आहेत.

भारताचा दिग्गज फलंदाड विराट कोहलीने देखील ब्लू टीक गमावली आहे.

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांचा देखील ब्लू टीक गायब झालेल्यांमध्ये समावेश आहे. यावरू अनेक लोकांनी मीम्स पोस्ट केल्या आहेत.

आता काय करणार?

ट्विटरने ब्लू टीकसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहे. ट्विटर ब्लू टिक घेण्यासाठी भारतीय वापरकर्त्यांना दरमहा 650 रुपये मोजावे लागतील.

जर तुम्ही दरमहा 650 रुपये भरले तर तुम्हाला एका वर्षात 7800 रुपये द्यावे लागतील, तर वार्षिक योजना घेतल्यास खूप पैसे वाचतील.

ट्विटर ब्लू टिकचा वार्षिक प्लॅन 6800 रुपये आहे. ट्विटर ब्लू टिकची सेवा घेतल्यानंतर तुम्हाला 4 हजार अक्षरांमध्ये ट्विट करता येणार आहे. या सेवेमध्ये तुम्हाला 30 मिनिटांत 5 वेळा एडिट करण्याची सुविधा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT