Can refusal of in flight refreshments lead to arrest Air India  
Trending News

एअर होस्टेसने विमानात खाऊ दिला तर नकार देऊ नका.. अटक होऊ शकते, काय आहे कारण ?

जेद्दाह ते दिल्लीच्या 6 तासांच्या प्रवासात प्रवाशाने मोफत अन्न व पेय नाकारल्याने त्याला अटक करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

एअर इंडियाच्या एका प्रवाशाला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 69 लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेद्दाह ते दिल्लीच्या फ्लाइट एआय 992 दरम्यान त्याने कोणताही नाश्ता स्वीकारण्यास, काहीही खाण्यास तसेच पिण्यास नकार दिला होता.

यामुळे त्याच्याविरुद्ध संशय निर्माण झाला. परिणामी त्याला अटक करण्यात आली. असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र फ्लाईटमध्ये दिला जाणारा अल्पोपहाराला नकार दिला तर अटक होऊ शकते का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सामन्यतः विमानात प्रवास करताना अनेक सुविधा दिल्या जातात. अल्पोपहारदेखील त्यातीलच एक भाग आहे. अल्पोपहार हा कालावधीपाहून दिला जातो. प्रवासास अधिक काळ लागणार असेल तर जेवण दिले जाते. तर कमी कालवधीचा प्रवास असेल तर पेये आणि काही पॅक केलेले स्नॅक्स जसे की शेंगदाणे, कॉर्न.

एअर इंडियाच्या प्रवाशाने विमान प्रवासादरम्यान काहीही खाण्यास किंवा पिण्यास नकार दिल्याने त्यांना अटक करण्यात आली ही एक मजेशीर बाब आहे. पण, नकार देण्याऱ्या या प्रवाशाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर 69 लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले.

फ्लाइटमध्ये काही खाणे किंवा पिणे बेकायदेशीर नाही. असे करण्यामागे प्रवाशांकडे अनेक कारणं असतात. जसे की उपवास, आहारातील निर्बंध आणि बरेच काही, ज्यामुळे ते अन्न किंवा पेये घेण्यापासून परावृत्त होऊ शकतात.

पण यापूर्वीही सोन्याच्या तस्करीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळं, कोणत्याही प्रवाशाने अल्पोपहाराला नकार दिला तर त्याकडे गंभीरतेने लक्ष देणं हे फ्लाइट क्रूने घेतलेले एक सावधगिरीचे पाऊल आहे. कारण ते तस्करीच्या प्रयत्नांचे एक सूचक संकेत असतात. त्यामुळं विमानातील अल्पोपहाराला नकाल दिला तर अटक होण्याची दाट शक्यता असते.

प्रवाशाने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये 69 लाखांहून अधिक किमतीचे सोने चार ओव्हल कॅप्सूलच्या रूपात लपवले होते. सहआयुक्त (सीमाशुल्क) मोनिका यादव यांनी सुमारे 1096.76 ग्रॅम सोने जप्त करण्यात आल्याची पुष्टी केली. सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, केबिन क्रूला लांब पल्ल्याच्या फ्लाइटमध्ये खाद्यपदार्थ आणि पेये नाकारणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, कारण हे शरीरामधून सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नांचे लक्षण असू शकते.

जेद्दाह ते दिल्लीब हा साधारण साडेपाच तासांचा विमान प्रवास आहे. या फ्लाईटमध्ये एअर होस्टेसने आरोपी प्रवाशाला पाणी, चहा, जेवण आणि इतर अल्पोपहाराची ऑफर दिली होती, मात्र त्याने काहीही घेण्यास नकार दिला.

प्रवाशाने सतत नकार दिल्याने क्रू मेंबर्सना संशय आला आणि त्यांनी कॅप्टनला माहिती दिली. यानंतर पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशाची कसून झडती घेण्यात आली. यावेळी प्रवाशाने गुदाशयात सोने लपल्याचे उघड झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

SCROLL FOR NEXT