Cheapest Flight Ticket Booking websites: विमान प्रवास सामान्य कुटुंबातील व्यक्तींचे स्वप्नच म्हणावे लागेल. प्रत्येक सामान्य कुटुंबातील व्यक्तीला विमानप्रवास करावासा वाटतो.
पण ते स्वप्नच राहतं. तुमचं हे विमान प्रवासाचं स्वप्न पुर्ण करणारी एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरून तिकीट बुक केलं तर तुम्ही भाजी आणायलाही विमानाने जाऊ शकता.
होय हे खरं आहे, फ्लाइटने प्रवास करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. यामुळेच अनेकांना रेल्वे किंवा बसने प्रवास करावा लागत आहे, ज्यामध्ये वेळ तर वाया जातोच, पण प्रवासातही खूप त्रास होतो.
जर तुम्हाला हे नको असेल आणि फक्त फ्लाइटने प्रवास करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका वेबसाइटबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला ट्रेनच्या जवळपास तिकीट दरात फ्लाइट तिकीट ऑफर करते.
एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचा बेत आखला जातो तेव्हा देशांतर्गत प्रवासासाठी सहसा आपण रेल्वेला प्राधान्य देतो. पण, विषय जेव्हा वेळ वाचवण्याचा येतो तेव्हा मात्र अनेकांचीच पसंती विमान प्रवासाला असते. अवघ्या काही तासांत एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचं स्वातंत्र्य विमान प्रवासामुळं मिळतं.
त्यामुळं वेळेची बचत होते आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी जास्त वेळही देता येतो. पण, इच्छा असूनही काही मंडळींना विमान प्रवास करता येत नाही. कारण असतं ते म्हणजे विमान तिकीटांचे दर.
या वेबसाईटचे नाव ssta safar असे आहे. ही वेबसाइट तुम्हाला सर्वात स्वस्त विमान तिकिटे देते. खरं तर, जेव्हा तुम्ही या वेबसाइटवर तिकीट शोधता तेव्हा ते बाजारात उपलब्ध असलेल्या प्रत्येक ऑनलाइन फ्लाइट तिकीट बुकिंग पोर्टलवरून डेटा मिळवते.
फ्लाइटच्या दरांची तुलना करते आणि नंतर सर्वात स्वस्त ते महागड्या फ्लाइटची यादी सादर करते.
तुम्हाला सूचीच्या शीर्षस्थानी सर्वात स्वस्त फ्लाइट तिकिटे पहायला मिळतील आणि जसजसे तुम्ही यादीत खाली जाल तसतसे फ्लाइट तिकिटे महाग होतील.
तुम्ही फ्लाइट आणि दरानुसार तिकीट पर्याय निवडू शकता आणि बुकिंग प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर तुम्हाला या वेबसाइटवर फ्लाइटचे दर जाणून घ्यायचे असतील तर आम्ही तुम्हाला सांगतो.
वाचवा 1000 रूपये
सिंगल आणि इकॉनॉमी पॅसेंजरसाठी, एक्साइडचे जास्तीत जास्त भाडे हे 4500 च्या आसपास आहे. परंतु या वेबसाइटवर तुम्हाला हे तिकीट 4261 रुपयांना मिळते. जर तुम्ही कूपन लागू केले तर तुम्हाला 200 रुपयांची सूट मिळेल. तुम्ही सुमारे 600 ते 1000 रूपये वाचवू शकता.
दुसरीकडे, जर तुम्ही सामान्य वेबसाइटवरून बुक केले तर तुम्हाला तेच तिकीट 5000 ते 6000 रूपये पर्यंत मिळते. तुम्हाला हा फरक समजू शकतो आणि जर तुम्ही त्याच दिवशी फ्लाइट बुक केली तर तुम्हाला कळेल की दर किती आहे.
हे गो एअरचे फ्लाइट रेट सांगितले आहे. जर तुम्ही एअर इंडिया किंवा एअर एशियाकडून फ्लाइट तिकीट बुक केले तर तुम्हाला त्याच तिकिटासाठी सुमारे ₹ 11000 ते 13000 रूपये मोजावे लागतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.