Chacha Nehru Children's Day Esakal
Trending News

Chacha Nehru Children's Day: चाचा नेहरु यांच्याबद्दल माहिती नसलेले 10 फेक्‍ट्स

स्वातंत्रपूर्वीच्या काळात सगळेच नेते केवळ पांढरा सदरा घालायचे, नेहरू हे पहिले नेते होते ज्यांनी या सदऱ्यावर ‘जॅकेट’ चढविले. हेच पुढे ‘नेहरू जॅकेट’ म्हणून प्रसिद्धीस पावले.

सकाळ डिजिटल टीम

चाचा नेहरूंचे लहान मुलांवर जीवापाड प्रेम होते. लहान मुले त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणून हाक मारीत. नेहरूंनी आपल्या कारकिर्दीत लहान मुलांच्या कल्याणासाठी खूप कार्य केले, म्हणूनच 1964 साली नेहरूंच्या मृत्यूनंतर 14 नोव्हेंबर ही नेहरूंची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

आजच्या लेखात आपण नेहरूंशी निगडीत असणाऱ्या 10  फेक्‍ट्सची माहिती घेणार आहोत.

1) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळला. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

2) पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे घेतले. 

3) नेहरूंचे आजोबा होते दिल्लीचे शेवटचे ‘कोतवाल’ही गोष्ट फारच कमी लोकांना ठाऊक असेल की नेहरूंचे आजोबा ‘गंगाधर पंडित’ हे दिल्ली प्रदेशाचे शेवटचे कोतवाल होते.

4) गांधीजींनी 1921 मध्ये असहकाराची चळवळ सुरू करताच जवाहरलालना प्रथम अटक झाली. तुरुंगात जाण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. तेव्हापासून त्यांच्या तुरुंगयात्रा सुरू झाल्या.

5) नेहरूंनी 1935 मध्ये तुरुंगवास भोगत असताना त्यांनी “Toward Freedom” नावाचे आत्मचरित्र लिहिले. हे पुस्तक 1936 साली अमेरिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले.

6) स्वातंत्रपूर्वीच्या काळात सगळेच नेते केवळ पांढरा सदरा घालायचे, नेहरू हे पहिले नेते होते ज्यांनी या सदऱ्यावर ‘जॅकेट’ चढविले. हेच पुढे ‘नेहरू जॅकेट’ म्हणून प्रसिद्धीस पावले.

7) नेहरुंना सिगारेटचे भारी व्यसन होते (चेन स्मोकर )सिगरेट पिताना नेहरूंचा फोटो तुम्ही अनेकवेळा पाहिला असेल. त्यांचा सिगरेटचा सर्वात आवडता ब्रॅंड होता ‘555 सिगारेट’.

8) भारतीय इतिहासाचे गाढा अभ्यासक नेहरू हे कश्मिरी पंडित होते. त्यामुळे आपसूकच पंडिती अभ्यासाचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. प्राचीन  भारत, वेद, संस्कृत आणि अश्या प्रकारच्या साहित्यांचे त्यांनी अनेक वर्षे अध्ययन केले, आणि त्यातून नेहरूंनी भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची उकल करणारे “Discovery of India” हे पुस्तक लिहिले.

9) रावी नदीच्या तीरावर त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्राने संपूर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली. या संपूर्ण स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेची सांगता पंडितजींच्याच नेतृत्वाखाली 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 12 वाजता देशाने केली. इतिहासात असा अपूर्व योगायोग क्वचितच आढळतो.

10) नेहरूंना वायफळ खर्च अजिबात आवडायचा नाही. ते बाहेर जायला गाडीने निघायचे. त्यावेळी एखादा नळ उघडा दिसला तर गाडी थांबवून ड्रायव्हरला नळ बंद करण्यासाठी पाठवायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT