मुंबई : दोन दिवसांपूर्वी एका स्पाईसजेटच्या महिला कर्मचाऱ्यानं विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थात ASI गिरीराज प्रसाद यांच्या कानशिलात लगावल्यानं खळबळ उडाली होती. याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. यावरुन संबंधित महिलेवर टीका होऊ लागली होती.
पण आता यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं आपल्याशी नको ती मागणी केल्याचं तिनं आपल्या जबाबात सांगितलं आहे. (CISF Personnel Slapped by Spicejet woman employee case new disclosure by her)
११ जुलै २०२४ रोजी पहाटे ४.३० वाजता राजस्थानातील जयपूर विमानतळावर हा प्रकार घडला होता. पोलिसाच्या कानशिलात लगावणाऱ्या महिलेनं सांगितलं की, "मी माझं काम करत होते तेव्हा ASI गिरिराज प्रसाद यांनी शेरेबाजी केली. त्यानं म्हटलं की, आम्हाला पण तुमची सेवा करण्याची संधी द्या. एक रात्र थांबवण्याचं काय घेणार? त्याच्या या शेरेबाजीनंतर मी त्याला म्हटलं की, या वागण्याबद्दल मी तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करेन. यावर तो पुन्हा म्हणाला की, तुझ्या सारख्या बाजारू महिला मी खूप बघितल्या आहेत. तुला मी नोकरीवरुन काढून टाकू शकतो. यानंतर मी त्याच्याविरोधात तक्रार करण्यापूर्वीच त्यानं माझ्या विरोधात तक्रार दाखल केली"
मी पोलिसांशिवाय कुठेही यासंदर्भात तक्रार केलेली नाही. स्पाईसजेटमध्ये काम करताना मला ५ वर्षे झाली आहेत. त्यामुळं विमानतळावर वावरण्याच्या नियम आणि अटी काय आहेत, हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळं मी जबरदस्तीनं तिथून आतमध्ये चालले होते आणि माझ्याकडं ओळखपत्र नव्हतं हे त्या पोलिसाचं सांगणं खोटं आहे. आमची सीआयएसएफ अधिकाऱ्यांशी नेहमीच संवाद होतो पण शक्यतो आम्ही महिला अधिकाऱ्यांशीच बोलतो पुरुष अधिकाऱ्यांशी आम्ही संवाद देखील साधत नाही, असंही या महिलेनं सांगितलं आहे.
तसंच विमानतळावर दिवसभरात CISFच्या महिला पोलीस कर्मचारी तैनात असतात पण रात्रीच्यावेळी नसतात. आम्ही केटरिंग व्हॅन घेतो, तिथं तैनात असलेल्या पोलिसाला स्लिप देतो आणि आम्ही डिपार्चर हॉलच्या दिशेने जातो असं दररोज इथं घडतं, पण तिथं कधीही महिला कर्मचारी नसतात", अशी खंतही या महिलेनं व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.