CISF Personnet Slapped by Women 
Trending News

CISF Personnel Slapped: कंगनाच्या प्रकरणानंतर पुन्हा CISF जवानाबाबत विचित्र प्रसंग; कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : स्पाईसजेट या विमान कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यानं विमानतळावर तैनात असलेल्या एका केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं वृत्त आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तपासणी दरम्यान वाद झाल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. (CISF Personnel Slapped by Women of SpiceJet video went viral)

अनुराधा राणी असं मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव आहे. सुरक्षेच्या कामासाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी या महिलेवर अटकेची कारवाई झाली आहे. स्पाईसजेटमध्ये ती फूड सुपरवाजर म्हणून काम करत आहे.

नेमकं काय घडलं?

अरुराधा राणी या इतर कर्मचाऱ्यांसह व्हेईकल गेटमधून पहाटे ४ वाजता विमानतळावर दाखल झाल्या. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिरीराज प्रसाद यांनी त्यांना थांबवलं. कारण त्यांच्याकडं या गेटमधून आत प्रवेश करण्याची अधिकृत मंजुरी नव्हती. त्यामुळं प्रसाद यांनी त्यांना जवळच्या विमान कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रवेशद्वारातून तपासणीद्वारे आत येण्यास सांगितलं.

तपासणी करण्यास सांगितल्यानंतर ही महिला अचानक भडकली आणि तिनं थेट गिरीराज प्रसाद यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाल्यानंतर कानशिलात लगावणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT