Bengaluru Road Rage: Electric Scooter Rider Smashes Car with Coconut Shell esakal
Trending News

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

Coconut Shell Attacker : पीडिताने अंगावर काटा आणणारा व्हिडीओ X वर केला शेअर;पोलिसांकडून लवकरच होणार कारवाई

सकाळ डिजिटल टीम

Bengluru : बंगळुरूच्या रस्त्यावर रविवारी एक धक्कादायक घटना घडली. मार्केटिंग प्रोफेशनल दीपक जैन यांच्यासोबत अटॅकची घटना घडली आहे. त्यांनी सोशल मीडियावर (ट्विटरवर) हा किस्सा शेअर केला आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरवर असलेल्या एका व्यक्तीने रस्त्यावर दीपक जैन यांची कार अडविली. त्यानंतर त्याने कारच्या काचा आणि मागच्या बाजूच्या काचा नारळाच्या कोशाने फोडल्या. या घटनेचा काही भाग कारच्या डॅश कॅमेरात कैद झाला आहे.

पूर्व बंगळुरूच्या वार्तूर परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. जैन यांनी सांगितले की, डाव्या बाजूने त्यांची कार ओला स्कूटरने रोखण्याचा प्रयत्न केला. "काही अंतरावर मी पाहिले की तो माझा पाठलाग करत आहे आणि ओरडत आहे, आणि थांबण्यासाठी मोठ्याने किंचाळत आहे. त्याने माझा मार्ग अडवला आणि माझ्या कारच्या समोर त्याने स्कूटर पार्क केली," असे जैन यांनी X वर (पूर्वी ट्विटर) त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

"रागाच्या भरात त्याने रस्त्यावरून एक नारळाचा कवच उचलला. हल्ला करण्यासाठी तो माझ्या कारकडे येताना त्याचा चेहरा दिसत होता."

दुचाकीस्वाराने त्यांच्या कारच्या उजव्या बाजूची काच फोडली आणि त्यांना ती उघडण्यास भाग पाडले. "नंतर त्याने उजवे ORVM तोडले आणि आक्रमकपणे ओरडत राहिला," असे जैन यांनी थ्रेडमध्ये म्हटले आहे.

त्याने कारच्या काचा अनेक वेळा फोडल्या आणि पळून जाण्याचा प्रयत्न करताना नारळाच कवच कारच्या मागच्या काचेवर फेकले.

त्यांनी काही मीटर पुढे चालवल्यानंतर दुसरी कार त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करत होती."ड्रायव्हरच्या संशयास्पद वर्तनावरून ते एकाच टोळीचे असावेत असा माझा संशय आहे," "मी अजूनही या धक्कादायक घटनेतून बाहेर पडलो नाहीये. मी दरवाजा किंवा खिडकी उघडली असती तर त्याच्या आक्रमकतेमुळे मी माझा जीव गमावू शकलो होतो. देवाच्या कृपेने माझ्याकडे डॅश कॅम होते आणि संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली."असे ते म्हणाले

त्यांनी या घटनेचा एक मिनिटाचा डॅश कॅमेरा व्हिडिओही शेअर केला आहे. "काचा फोडण्याचा आवाज ऐकला की अंगावर काटा उभे राहतात," असे ते म्हणाले.

बंगळुरूच्या व्हाइटफील्डमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या X अकाउंटवरून सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि लवकरच कारवाई केली जाईल,असे पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT