cow in shopping mall google
Trending News

Viral Video : शॉपिंग मॉलमध्ये घुसली गाय आणि मग....

सध्या सोशल मीडियावर एका मॉलमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील मॉल कर्मचारी बरेच गोंधळलेले दिसत आहे

नमिता धुरी

मुंबई : काही लोक खरेदीसाठी आपला कुटुंबकबिला घेऊन शॉपिंग मॉलमध्ये जातात तर काही लोक एकटेच टाइमपास करण्यासाठी मॉलमध्ये फिरत बसतात.

सध्या सोशल मीडियावर एका मॉलमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील मॉल कर्मचारी बरेच गोंधळलेले दिसत आहे; कारण रोज मानवी रुपातील ग्राहक बघण्याची सवय झालेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी वेगळाच अनुभव येत आहे. हेही वाचा - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक गाय दिसत आहे जी एका शॉपिंग मॉलमध्ये घुसली आहे. धुमाकूळ घालणाऱ्या या गाईच्या मागे मॉल कर्मचारी धावत आहेत. मॉलमध्ये कपड्यांच्या विभागात शिरलेल्या या गाईला आवरताना मॉल कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

हा व्हिडिओ कोणत्या मॉलमधील आहे हे समजायला मार्ग नाही. मॉलच्या कपड्यांच्या विभागात ही गाय शिरली आहे. तेथे नीट मांडून ठेवलेल्या कपड्यांच्या अधूनमधून ही गाय धावते आहे.

कर्मचारी तिच्या मागे धावत आहेत तर काहीजण तिचा व्हिडिओ बनवत आहेत. पण तिला मात्र कसलीच पर्वा नाही. ती बिनधास्त मॉलमध्ये इथून-तिथे पळत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. कोणी म्हणतंय 'तिला शॉपिंग करायची असेल' तर, कोणी म्हणतंय 'तिचा १ तारखेला पगार झाला असेल'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT