'जो कोणी माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत करेल तो मरेल', असा शापच त्यानं खुर्चीला दिला.
भयानक कथा ऐकताना किंवा तसे चित्रपट पाहताना अनेकदा जुने पडके वाडे, घरे वास्तू शापित असल्याचे सांगितले जाते. हे काल्पनिक आहे याची माहिती असूनही आपण ते चित्रपट बघताना, गोष्टी ऐकताना भितीने आपला थरकाप उडतो. पण, खरंच अशा काही शापित वास्तू, काही ठिकाणे अस्तित्वात आहेत का, असा विचार आल्याशिवाय राहत नाही.
भारतात तर अशा गोष्टींची भिती घालणाऱ्या अनेक कथा सापडतील. पण, परदेशातही एका वास्तूसंग्रहालयात एक खुर्ची (Chair) आहे. जी शापित खुर्ची म्हणून प्रसिद्ध आहे. इंग्लंडमधील ही शापित खुर्ची थर्स्कच्या संग्रहालयात आहे. ती शापित खुर्ची 320 वर्ष जुनी असून तीने आजवर अनेकांचे जीव घेतले आहेत. त्यामागील कथा आणि ती खुर्ची शापित कशी झाली ते पाहुयात.
१८ व्या शतकात थॉमस बस्बी (Thomas Busby) नावाचा माणूस थर्स्क येथे राहत होता. त्याचा डॅनियल ऑटी (Daniel Auty) नावाचा पार्टनर होता. हे दोघेही बनावट नाणी बनवण्याचे बेकायदेशीर काम करायचे. डॅनियल हा थॉमसचा चांगला मित्र तर होताच. पण, थॉमसने त्याची मुलगी एलिझाबेथशीही लग्न केले होते. पुढे ही मैत्री आणखी घट्ट झाली. रोज काम संपल्यावर दोघे थर्स्क येथील त्यांच्या आवडत्या बारमध्ये एकत्र बसायचे आणि तिथे भरपूर मद्यपान करायचे. थॉमस नेहमी त्या बारमध्ये एकाच खुर्चीवर बसायचा. त्यामुळे त्याला ती खुर्ची विशेष आवडायची.
रोज रात्री तिथे गेल्यावर त्या खुर्चीत कोणी बसले असेल. तर थॉमस त्याच्याशी भांडू लागायचा. मग, बळजबरीने तेथून हटवून ते स्वतः त्यात बसायचा. कथा 1702 मध्ये सुरू होते. एके दिवशी एका बारमध्ये थॉमस आणि डॅनियल यांच्यात कशावरून तरी भांडण झाले. भांडणाते रूपांतर मारामारीत झाले. मग डॅनियल थॉमसला चिडवण्यासाठी त्याच्या आवडत्या खुर्चीत बसला. हे पाहून थॉमसला इतका राग आला की त्याने डॅनियलचा खून केला.
पोलिसांनी (Police) थॉमसला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. ज्यानंतर थॉमसला सासऱ्याच्या हत्येसाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्या दिवशी थॉमसला फाशी दिली जाणार होती. त्या दिवशी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. फाशी देण्यापूर्वी आपली शेवटची इच्छा व्यक्त करताना थॉमसने सांगितले की, थर्स्क येथील बारमध्ये त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसून आपले शेवटचे जेवण करायचे आहे. थॉमसची ही इच्छा मान्य करण्यात आली आणि त्याला त्याच बारमध्ये नेण्यात आले. जेवण संपवून तो उभा राहिला आणि बोलू लागला, 'जो कोणी माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत करेल तो मरेल', असा शापच त्याने खुर्चीला दिला.
त्या काळापासून ही खुर्ची खरोखरच शापित झाली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी रॉयल एन्फोर्सर्सचे दोन पायलट त्या पबमध्ये आले आणि त्या खुर्चीवर बसले. त्यानंतर ते दोघे पबमधून बाहेर येताच त्यांच्या कारचा अपघात झाला. आणि दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. यानंतर या खुर्चीवर जो कोणी बसला त्याच्याबाबतीत काहीतरी वाईट घटना घडून त्यांचा गूढ मृत्यू झाला. बारमध्ये येणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळ नको, असा विचार करून त्या बारच्या मालकाने ही खुर्ची पबच्या गोडाऊनमध्ये ठेवली. मात्र इथेही या खुर्चीचा शाप दूर झाला नाही. एकदा एक कामगार काही सामान ठेवण्यासाठी गोदामात गेला. तो थकला आणि त्या खुर्चीवर बसला. त्यानंतर तासाभराने त्या कामगाराचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर पबच्या मालकाने ही खराब खुर्ची थर्स्कच्या संग्रहालयाला दान केली. संग्रहालयात येणारे लोक त्यावर बसू नयेत यासाठी ही खुर्ची ५ फूट उंचीवर ठेवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.