DD News Anchor Viral Video Esakal
Trending News

DD News Anchor Viral Video: "पाकिस्तानचा झेंडा आणला तर बुटाने मारत हाकलेन" पाहा, डीडी न्यूजच्या डिबेटमधील राडा

DD News Anchor Viral Video: दरम्यान ही घटना 28 ऑगस्ट रोजी घडली होती, मात्र याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.

आशुतोष मसगौंडे

सरकारी वृत्तवाहीनी डीडी न्यूजच्या एका लाईव्ह कार्यक्रमात झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कार्यक्रमाचा अँकर आणि जम्मू आणि काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते नासिर लोन यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, "मी स्टुडिओमध्ये पाकिस्तानचा ध्वज आणला तर तुम्ही काय कराल?" असे नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रवक्त्याने कथितरित्या म्हटल्यानंतर त्यांच्यावर डीडी न्यूजचा अँकर ओरडताना दिसत आहे.

नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रवक्त्याने कथितरित्या केलेल्या पाकिस्तानी झेंड्याच्या वक्तव्यानंतर अशोक श्रीवास्तव यांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली, "हिम्मत है तो ला कर देखिए. आप के बाप मे दम नहीं है की पाकिस्तान का झंडा यहाँ लेने आ जायेंगे."

"मी ही भाषा वापरत आहे कारण तुमच्यासारख्या देशद्रोही लोकांनी इथे पाकिस्तानचा ध्वज आणण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला माझ्या बुटाने हाकलून देईन," असे अँकर अशोक श्रीवास्तव पुढे म्हणाले.

दरम्यान ही घटना 28 ऑगस्ट रोजी घडली होती, मात्र याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.

यापूर्वीही झाला होता राडा

डीडी न्यूजच्या स्टुडिओमध्ये यापूर्वीही अशीच घटना घडली होती. ज्यामध्ये कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रेक्षकांनी अँकरला मारहाण केली होती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्टुडिओमध्ये काही लोकांमध्ये वाद सुरू आहे. हा व्हिडिओ डीडी न्यूजच्या स्टुडिओचा असल्याचे सांगण्यात येत आहे, जिथे वादविवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या अँकर आणि प्रेक्षकांमध्ये वाद झाला होता.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्टुडिओ, अँकर आणि प्रेक्षक स्पष्टपणे दिसत आहेत. डिबेट शो संपल्यानंतर काही संतप्त प्रेक्षकांनी अँकरवर कमेंट केल्याने हा वाद झाल्याचा दावा काही लोक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री? पुण्यात निकालाआधीच लागले शुभेच्छांचे बॅनर

Fact Check : सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची बिटकॉइन घोटाळ्याची 'ती' ऑडिओ क्लिप खोटी

Latest Maharashtra News Updates : गौतम अदानींना आणखी एक मोठा झटका, केनिया सरकारने 5 हजार कोटींचा करार रद्द केला

अक्कलकोटमध्ये शेतीच्या बांधावरुन ६० वर्षीय व्यक्तीचा खून! कुऱ्हाडीचे ४ घाव, पण डोक्यातील घावाने घेतला जीव; तिघांवर गुन्हा, दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT