Deer Video Sakal
Trending News

Viral Video : जरा आदर्श घ्या! हरीणही पाळतंय ट्राफिक नियम; पाहा भन्नाट व्हिडिओ

प्राणी वाहतुकीचे नियम पाळतात आणि आपण...

सकाळ डिजिटल टीम

रस्त्याने वाहने चालवताना अनेकजण वाहतुकीचे नियम मोडत असतात. तर आपणही कित्येकदा वाहतुकीचे नियम मोडले असतील. नियम मोडल्यास प्रत्येक देशात दंड भरावा लागतो पण काही देशात प्राणीसुद्धा हे नियम पाळत असतात. हे वाचून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण हो. हे खरं आहे. सध्या हरिणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या बाजूला एक हरिण उभा असलेलं दिसत आहे. तर रस्त्याने गाड्या जात असताना ते बाजूलाच थांबलेलं दिसत आहे. पण सिग्नल लागला आणि वाहने थांबल्यावर त्याने लगेच झेब्रा क्रॉसिंगच्या मदतीने रस्ता ओलांडला आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

"प्राणीही वाहतुकीचे नियम पाळतात पण आपल्याला नियम पाळणे होत नाही ही एक खंत आहे, याचा जरा आदर्श घ्या" अशा कमेंट अनेक नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर या हरिणाचे अनेकांनी कौतुकही केलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi On Digital Arrest : तुम्हालाही 'डिजिटल अरेस्ट'चा धोका... PM मोदींनी सांगितले बचावाचे उपाय

Mohammad Shami ने मागितली BCCI ची माफी; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यानंतर पोस्ट केला Video

Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्करचा पती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या मैदानात, मुंडेंचा विरोधकही ठरला

Latest Maharashtra News Updates Live : आरपीआयला दोन जागा देण्याची रामदास आठवले यांची मागणी

Diwali 2024 Jewellery: पारंपारिक कपड्यांसह शोभून दिसतील 'हे' दागिने, दिवाळीच्या दिवशी दिसाल सुंदर

SCROLL FOR NEXT