Trending News

Demonetization : देशात एकेकाळी १० हजार रुपयांची नोट केली होती बाद; स्वातंत्र्यापूर्वीपासून सुरू आहे हा ट्रेंड

Sudesh

आरबीआयने शुक्रवारी दोन हजार रुपयांच्या नोटीला चलनातून बाद करण्याचा निर्णय घेत, सर्वसामान्यांना धक्का दिला. यामुळे २०१६ साली करण्यात आलेल्या नोटबंदीच्या आठवणी ताज्या झाल्या. अर्थात, २०१३-१४ साली देखील असाच एक निर्णय घेण्यात आला होता, असं आरबीआयने म्हटलं आहे. त्यावेळी रिझर्व्ह बँकेने २००५ पुर्वी छापण्यात आलेल्या नोटांना चलनातून बाद केलं होतं.

नोटांना चलनातून बाद करण्याचा हा ट्रेंड खरंतर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. १९४६ साली पहिल्यांदा अशा मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय (Demonetization) घेण्यात आला होता. तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल सर आर्चीबाल्ड यांनी १२ जानेवारी १९४६ रोजी मोठ्या नोटांना डिमॉनिटाईज करण्याचा अध्यादेश पारित केला होता.

या आदेशानुसार, २६ जानेवारी १९४६ रोजी तेव्हाच्या ५००, १००० आणि १०,००० रुपयांच्या नोटा (ten thousand rupee note India) चलनातून बाद झाल्या होत्या. म्हणजेच, १०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या सर्व नोटांवर यावेळी बंदी लागू करण्यात आली होती.

काळा पैसा संपवण्यासाठी निर्णय

विशेष म्हणजे, ब्रिटिश सरकारने लागू केलेल्या या नोटबंदीचा उद्देशही देशातील काळा पैसा संपवणे असा होता. भारतीय व्यापाऱ्यांनी ब्रिटिश सरकारपासून कर चुकवून भरमसाठ पैसा साठवल्याचे म्हटले जात होते. हा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

१९७८ सालची नोटबंदी

स्वातंत्र्यानंतर थेट १९७८ साली पुन्हा एकदा नोटबंदीचा निर्णय (Demonetization in 1978) घेण्यात आला. तेव्हा देशात जनता पार्टीचे सरकार होते. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सत्ता स्थापनेच्या एका वर्षातच नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. मागील सरकारमधील काही भ्रष्ट लोकांना लक्ष्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असं म्हटलं जातं.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी १९७८ रोजी मोठ्या नोटा बंद करण्याचा आपला विचार असल्याचे सरकारकडून आरबीआयला सांगण्यात आले. यानंतर आरबीआयने नोटा चलनातून बाद करण्याचा अध्यादेश बनवला. तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी या अध्यादेशाला मान्यता दिली.

यानंतर १६ जानेवारी १९७८ या दिवसापासून १०००, ५००० आणि १०,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. १६ जानेवारी रोजी सकाळीच आकाशवाणीवरून याची घोषणा करण्यात आली होती.

२०१६ची नोटबंदी

यानंतर भाजप सरकारने २०१६ साली नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ८ नोव्हेंबर २०१६ पासून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. यांच्या ऐवजी ५०० रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली, तर १००० रुपयांची नोट बंद होऊन त्याजागी २००० रुपयांची नोट आणली गेली होती.

देशातील काळ्या धनावर अंकुश लावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार ५०० आणि हजार रुपयांच्या ९९ टक्के नोटा बँकिंग सिस्टीममध्ये परत आल्या होत्या. या नोटबंदीच्या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या नोटबंदीचे समर्थन करत त्याविरोधात असणाऱ्या याचिका रद्द केल्या.

यानंतर आता आरबीआयने शुक्रवारी (१९ मे) २००० रुपयांच्या नोटाही (two thousand rupee note) चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. लोक आपल्याकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करू शकतात. तसेच, या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT